सावनेर :-कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक 2 अंतर्गत कामगार कल्याण केंद्र सावनेर तर्फे इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळातील कामगारांकरिता दिनांक 28 फेब्रुवारीला रेल्वे स्टेशन रोड राजकमल चौक सावनेर येथे सरस्वती महिला महाविद्यालयच्या विद्यार्थिनींने बेटी बचाओ बेटी पढाओ हे पथनाट्य सादर केले. यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या व सामान शिकणाला प्राधान्य देण्यात आले. याप्रसंगी भाऊ गोतमारे उपाध्यक्ष राष्ट्रीय कोयला खदान मजदूर युनियन, कार्यक्रमाच्या अध्यक्षा निता इंगोले प्राचार्या सरस्वती महिला महाविद्यालय सावनेर, प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद निमजे, अनिकेत ढाले, प्रज्वल अत्करी, राकेश लोहकरे, शिक्षिका नीता डोईफोडे व भारती महाजन यांनी मोलाची कामगिरी बजावली. पाहुण्यांचे व पथनाट्यतील कलावंतांचे कामगार कल्याण केंद्र सावनेर तर्फे प्रमोद निमजे यांनी आभार मानले.
बेटी बचाओ बेटी पढाओ पथनाट्याचे सादरीकरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com