6 ते 13 फरवरी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन.
पारशिवनी:- तालुकात असलेले ईटगाव येथिल श्री गजानन महाराज मंदिर, जे धार्मिकतेने नटलेले आहे. 6 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम संकिर्तण व शिव कथा सप्ताह श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. 13 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात मंदिराची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे. गजानन महाराजांच्या श्लोकांसह गण गण गणात बोतेच्या जयघोषाने भाविकांची गर्दी होत आहे.
दररोज असंख्य भाविक पूर्ण श्रद्धेने आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह या मंदिरात येतात आणि या सुंदर ठिकाणी देवाचे दर्शन घेऊन तृप्त होतात. मंदिर समितीने पुढील काळात धार्मिक व सामाजिक हित लक्षात घेऊन काम करण्याचा संकल्प केला आहे. मुख्य मंदिराच्या पलीकडे प्रागणात हरिनाम सप्ताह व शिव कथा सप्ताह करिता भव्य मंडप उभारण्यात आले असुन ६ फब्रेवरी पासुन गजानन महाराज मंदिरात कलश स्थापना जयसिग जालंधर व भरतसिग बांगडी यांचे हस्ते कलश स्थापित करून क्षध्देय ह भ प मोतीकुमार नागपुरे महाराज यांचे संगीतमय मधुर वाणीव्दारे अखंड हरिनाम संकितर्ण तसेच श्री संत गजानन महाराज विजय ग्रथ परायण ह भ प संदिप महाराज प्रतिदिन करित आहे. तसेच काकडा, भजन, विष्णु सहस्त्रनाम, नगर फेरी, विजय ग्रंथ पारायण, शिव कथा भजन किर्तन हरिपाठ तुलसीदास सादतकर, गणेश जुनघरे, विनोद देवराय , ईश्वर सनेसर, योगेश येवले, त्र्षीकेश ठाकरे, प्रदिप बगदान, अमोल खुरगे, राम जुनघरे, तसेच गावातील नागरिक हरिपाठ करित आहे.
दिनांक १३ फरवरी सोमवारला सकाळी पालखी सोहळायात इटगाव, खंडाका, रोहणा, पारडी, भागेमहारी, तामसवाडी, पोटा, करंभाड, गुढंरी, सह अनेक गावातील महिला पुरुषाचा भजन मंडळ सहभागी होणार असून दुपारी गोपाल काल्याचे किर्तन ह भ प . नागपुरे महाराज यांचे किर्तनात गोपाल काल्याचे दहीहंदी फोडुन नंतर महाप्रसाद चा आयोजन श्री गजानन महाराज देव स्थान कमेटी व गावकरी यांचे सहायाने महाप्रसाद नंतर हरिनाम सप्ताह व प्रकट दिनाचा समापन होणार.
मंदिर अतिशय सुंदर बनवले आहे. ज्यामध्ये महाराजांच्या पादुका व मूर्ती भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हे छोटेसे मंदिरही आकर्षण ठरणार आहे. संत गजानन महाराज प्रगटोत्सवानिमित्त दररोज सायंकाळी 5 वाजता विविध भजन मंडळांकडून अभिषेक, आरती, प्रसाद व भजने सादर होणार आहेत. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच 13 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता प्रागतोत्सव, अभिषेक, आरती, हवन, ढोल-ताशांच्या गजरात महाराजांची पालखी शहरात फिरणार विराजमान होणार आहे.
मंदिरातून गांधीचौक, बाजार चौक, श्री राम मंदिर मार्ग, होळी चौक, बसस्थानक, राजकमल चौक मार्गे भजन मंडळ, दिंडी, कलशधारी महिलांसह पालखी मंदिरात परतेल. दुपारी गजानन महाराजांच्या जयंतीनिमित्त पाळणा घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 1 ते 4 या वेळेत हभप टेकेश्वरानंद महाराज श्रीधाम वृंदावन यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी दादाजी भजन मंडळाचे गायक भगवंता मोरे यांचे भजनाचे भव्य सादरीकरण होणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.