कन्हान व कांद्री येथे वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – वट पौर्णिमा निमित्य विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून वटवृक्षा ची विधिवत पुर्जा अर्चना करून कन्हान व कांद्री परि सरात वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत येत असुन हिंदु धर्मात या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. मागील दोन वर्षापासुन कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे स्त्रियांना वट पुजा करण्यास मुकावे लागले होते. मात्र यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने स्त्रियां मध्ये वट पौर्णिमे च्या दिव शी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कन्हान परिसरातील विवाहित स्त्रियांनी वटपौर्णिमेंच व्रत करि त सोळा शृंगार करून वटवृक्षाची विधिवत पुजा अर्च ना, आरती करून झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळुन सात परिक्रमा केली. यावेळी विवाहित स्त्रियांनी आप ल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य लाभावे अशी मनोकामना करून वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान

मंगळवार (दि.१४) ला सकाळी सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान परिसरातील वट वृक्षा ची वटपौर्णिमा निमित्य जेष्ठ पौर्णिमेला सुहासीनी महि ला पतिच्या दिर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पुजा करतात . वड वृक्ष पुजन स्त्री जातीच्या सन्मानाचा सण होय. या वटवृक्षाची सकाळ पासुन पुजा करतांनी महिलांनी चांगलीच गर्दी केली होती. परिसरातील छाया नाईक, शकुंतला चौधरी, अल्का कोल्हे, शोभा अहिर, सुनिता पौनीकर, अनिता वंजारी, सुनिता येरपुडे, लता मोखर कर, सुमित्रा तकीतकर आदी महिलाची उपस्थित राहुन वटपोर्णिमा उत्सव थाटात साजरा केला.

कांन्द्री ला वटपौर्णिमा उत्सव थाटात साजरी

कांद्री येथे वटपौर्णिमे च्या दिवशी विवाहित स्त्रियां नी वडाची पुजा अर्चना करून आपल्या पतीच्या दीर्घा युष्यासाठी प्रार्थना केली. सकाळची नित्यकर्म उरक ल्या नंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पुजन करून सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवुन या दिवसा ला महत्व आणुन दिले, तसेच आजन्म सहवास आणि सातजन्माची साथ लाभण्यासाठी स्त्रिया देखील हे व्रत परंपरेनुसार पुजन करत असल्याने मंगळवार (दि.१४) जुन २०२२ ला विवाहित स्त्रियांनी वडाच्या वृक्षांची पुजा अर्चना करून वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गट

संताजी नगर कांद्री येथे भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गटा तर्फे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणुन साजरा करण्यात येतो. हया दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेला व्रत करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायु ष्य प्राप्त व्हावे म्हणुन वडाच्या झाडाची पुजा अर्चना केली. ग्रा पं कांद्री सदस्या अरुणा हजारे, राखी गभने, वंदना गडे, प्रीती लंगडे, त्रिवेणी हुड, सविता डोकरीमा रे, रीता मस्के, रूपाली हजारे, शुभांगी गडे, जान्हवी गडे, पोर्णिमा ठाकरे, प्रिया मस्के, रीता राजनकर, रानी लोनारे, शोभा मंगर, ज्योती दाडे, मीरा कुंभलकर, रानी कुंभलकर, निर्मला डोकरीमारे, सुनिता सावरकर, स्मिता लांडगे, ज्योती नान्हे, संगीता मोरे, बबली सिंग, भुमी पु-हे, नंदिनी हजारे, रीता शेन्द्रे, वंशिका झलके, पुजा हजारे, पल्लवी शर्मा, सुनिता चटप, प्रियंका मदन कर, सुषमा चवरे, पिंकी राय, मेघा कोल्हे, क्षितिजा नखाते, पुजा गुरव, सारिका उमरेडकर आदी महिलांनी उपस्थित राहुन वटपोर्णिमा उत्सव साजरा केला.

जय शितला माता मंदीर कांद्री कन्हान

मंगळवार (दि.१४) जुन ला सकाळी ६ वाजता पासुन वटपोर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. शितला माता मंदीर कांद्री येथे वड वृक्ष व पिंपळ वृक्षा ची विधिवत पुजापाठ करून प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी बेबीनंदा राऊत, वर्षा गि-हे, मंगला बंड, जया खैरकर, रेशमा गि-हे, मोनिका डाये, तुप्ती घरजाळे, नेहा रक्षक, कांचन सिंग, सविता यादव, जय श्री मरघडे, लता बावनकुळे, मिरा यादव, दुर्गा लाडे, आशा गुरव आदी महिला मंडळीनी उपस्थित राहुन वटपोर्णिमा उत्सव थाटात साजरा केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तुमसर तालुक्यात ट्रॅक्टर उलटुन दोघांचा दुर्दैवी अंत....

Tue Jun 14 , 2022
नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी मोहाडी :- तुमसर तालुक्यातील असलपाणी येथे ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. ट्रॅक्टर उलटून पेटल्याने दोघांचा जळून मृत्यू झाला आहे. सद्या पावसाळा लागला असून शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. तर तुमसर तालुक्यातील आसलपाणी येथिल दिनेश गौपाले हे आपल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन जात असताना कॅनल वर ट्रॅक्टर उलटला व पेट घेतला या ट्रॅक्टर खाली दिनेश गौपाले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com