लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ – शेवटच्या दिवशी नागपूर विभागात १४७ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशनपत्र

– विभागात पहिल्या टप्याागतील ५ मतदारसंघासाठी एकूण १८३ उमेदवारांचे २२९ नामनिर्देशनपत्र

– आज निमनिर्देशनपत्राची छाननी

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदासंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिमदिवसापर्यंत एकूण १८३ उमेदवारांची २२९ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. यापैकी नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी ३८, रामटेकसाठी ३४ ,चंद्रपूरसाठी २९,भंडारा-गोंदियासाठी ३४ आणि गडचिरोली-चिमूरसाठी १२ अशा एकूण १४७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. या पाचही मतदारसंघांमध्ये उद्या गुरुवार, २८ मार्च २०२४ उमेदवरांच्या नामनिर्देशपत्रांची छाननी होणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज ३८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून आतापर्यंत एकूण ५४ उमेदवारांनी ६२ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज ३४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून आतापर्यंत एकूण ४१ उमेदवारांनी ५१ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून आज एकूण ३४ उमेदवारांनी ४० नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. या मतदारसंघात आतापर्यंत एकूण ४० उमेदवारांनी ४९ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून आज डॉ. नामदेव दसाराम किरसान (इंडियन नॅशनल काँग्रेस), धीरज पुरूषोत्तम शेडमागे (जनसेवा गोंडवाना पार्टी), मिलींद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), हितेश पांडूरंग मडावी (वंचित बहुजन आघाडी), योगेश नामदेव गोन्नाडे (बहुजन समाज पार्टी), करण सुरेश सयाम (अपक्ष), सुहास उमेश कुमरे (भीमसेना), विलास शामराव कोडापे (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. या मतदास संघात आतापर्यंत एकूण १२ उमेदवारांनी १९ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून आज धानोरकर प्रतिभा सुरेश ( इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी ३ अर्ज, बेले राजेश वारलुजी (वंचित बहुजन आघाडी) यांनी ३ अर्ज, विद्यासागर कालिदास कासर्लावार यांनी १ अर्ज भीमसेना पक्षाच्यावतीने तर १ अर्ज अपक्ष म्हणून, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांनी २ अर्ज, जावेद अब्दूल कुरेशी यांनी १ अर्ज अपनी प्रजा हित पार्टीच्या वतीने तर १अर्ज अपक्ष म्हणून, रमेश आनंदराव मडावी यांनी १ अर्ज बहुजन समाज पार्टीच्यावतीने तर १ अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.

तसेच, पुर्णिमा दिलीप घनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (विरोंके वीर इंडियन पार्टी), मोरेश्वर कोंदुजी बडोले (अपक्ष), मिलिंद प्रल्हाद दहिवले (अपक्ष), सेवकदास कवडूजी बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, डेमक्रेटीक), अमोल ओमप्रकाश कोमावार (हिंदू राष्ट्र संघ), राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके (बहुजन समाज पक्ष), राजेंद्र कृष्णराव हजारे (अपक्ष), दिनेश रामबिशाल मिश्रा (अपक्ष), वनिता राजेंद्र राऊत (अखील भारतीय मानवता पक्ष), जावेद मजिद अब्दुल (अपक्ष), विकास उत्तमराव लसंते (सन्मान राजकीय पक्ष), वाघमारे संदीप विठ्ठल (अपक्ष), देठे प्रमोद देवराव (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे (अपक्ष), संजय हरी टेकाम (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), शेख ताजुद्दीन वजीर (अपक्ष), सुर्या मोतीराम अडबाले (अपक्ष), अनिल आनंदराव डहाके (अपक्ष), दिवाकर हरीजी उराडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), दिलीप पुंडलीकराव माकोडे (अपक्ष), गीता अरुण मेहर (अखील भारतीय परिवार पार्टी) यांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केला. या मतदारसंघात आतापर्यंत एकूण ३६ उमेदवारांनी ४८ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक २० मार्च रोजी अधिसूचना जारी होवून ५ दिवस नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. गुरुवारी २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Thu Mar 28 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या दोन हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री १६ मे २०१९ रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com