पोरवाल महाविद्यालयात एन. इ.पी. कार्यशाळेचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- एस.के. पोरवाल महाविद्यालय, कामठी आणि डॉ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस.महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता  एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोक कुमार भाटिया, विकास निर्देशक, शिक्षण प्रसारक मंडळ कामठी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. देवेंद्र कावडे, नॅक सल्लागार, बेंगुळुरू हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ.यशवंत पाटील प्राचार्य,डॉ. मधुकरराव वासनिक पी. डब्लू. एस. कॉलेज नागपूर हे उपस्थित होते. त्यासोबतच विजयकुमार शर्मा, सचिव, एस.पी.एम., कामठी, प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे व्यासपीठावर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकपर भाषणामध्ये डॉ. प्रशांत धोंगडे यांनी सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयामध्ये चालणाऱ्या विविध कार्यक्रमाची आणि कोर्सेसची ओळख करून दिली आणि आपल्या महाविद्यालयात आजपर्यंत गुणवत्ता पूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत कशाप्रकारे पोहचविल्या गेले त्याबद्दल सांगितले.

त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. यशवंत पाटील यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल थोडक्यात माहिती देऊन याबद्दल असलेला प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम कसा दूर करता येईल यासाठी आम्ही या कार्यशाळेचे आयोजन केले आहे असे सांगितले.

आजच्या कार्यशाळेचे बीजभाषक डॉ.देवेंद्र कावडे यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित प्राध्यापकांना नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल अतिशय इत्यंभूत अशी माहिती देताना म्हटले की, प्राध्यापकांनी आपल्यामध्ये आधी गुणवत्तापूर्ण असे व्यक्तिमत्व तयार करून घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण या गुणवत्तेच्या माध्यमातूनच प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवीत असतो.

प्राध्यापकांच्या गुणवत्तेचे अनुसरण विद्यार्थी हे सतत करीत असतात. आणि त्यांचे संस्कार आणि त्यांची मूल्य आपल्यामध्ये सतत आत्मसात करीत असतात. त्यामुळेच ते विद्यार्थी समाजासाठी एक आदर्श नागरिक निर्माण होत असतात. आणि असे आदर्श नागरिकच भारताचे भविष्य असल्यामुळे या आदर्श नागरिकांमधूनच विकसित भारत निर्माण होणार आहे यासाठी प्राध्यापकांनी आपली बुद्धिमत्ता पणाला लावून येणाऱ्या भारताचे भविष्यातील विद्यार्थी निर्माण करावे आणि देशाचा विकास साधावा असे सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. विनय चव्हाण यांनी  प्राध्यापकांनी स्वतः आपल्या आचरणातून मूल्य शिक्षण काय असते ते दाखवून देऊन ती मूल्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे रुजवता येईल याचा ध्यास घेतला पाहिजे आणि समाजासाठी आपल्या विद्यार्थ्यांमधून आदर्श नागरिक निर्माण केले पाहिजे असे सांगितले.अध्यक्षीय भाषणात अशोककुमार भाटिया यांनी सांगितले की, भारतामध्ये गुणवत्तापूर्ण विद्यार्थी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांच्यात ज्ञानाची कुठलीही कमतरता नाही पण भारतातील ह्या ज्ञानाचा वापर इतर देश ह्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना आपल्या देशात बोलवून आपल्या देशाचा विकास करून घेतात ही खेदाची गोष्ट आहे असे सांगितले.

करून घेतात महाविद्यालयामध्ये उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी उत्कृष्ट असे मैदान तयार करण्यात येईल याबद्दलचा विश्वास सर्वांसमोर बोलून दाखविला आणि महाविद्यालयाला उत्कृष्ट असे मैदान लवकरच मिळेल असा आशावाद व्यक्त केला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. तुषार चौधरी यांनी केले.तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद शेंडे यांनी केले.कार्यशाळेसाठी डॉ.मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय नागपूर येथील प्राध्यापक आणि प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापिका हे सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सफल जीवन के लिए सात्त्विक जीवनशैली आवश्यक ! - शॉन क्लार्क

Sat Aug 5 , 2023
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय द्वारा जयपुर ‘सी-20’ परिषद में आध्यात्मिक शोध प्रस्तुत ! जयपुर :- ‘सी-20 परिषद की ‘विविधता, समावेशकता एवं परस्पर आदर’ इस कार्यकारी गुट में सम्मिलित होने का निमंत्रण मिलने पर आनंद हुआ; क्योंकि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय का ‘अध्यात्म संशोधन केंद्र’ उक्त 3 सूत्रों का प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण है । सफल जीवन के लिए हमें सात्त्विक जीवनशैली स्वीकारने तथा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com