संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दोन आरोपी अटक, तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी पुलाजवळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि त्यांच्या प़थकाने अवैद्य वाळु वाहतुक करणा-या १२ चाकी ट्रक ला पकडुन दोन आरोपी ला ताब्यात घेऊन तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शुक्रवार (दि.७) जुन ला सकाळी ७ वाजता उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आप ल्या पथकासह कन्हान परिसरात पेट्रोलिंग करित असतांना जबलपुर ते नागपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने कन्हान मार्ग नागपुर कडे १२ चक्का टिप्पर ट्रक क्रमां क एम एच ४० सीटी ९०६३ हा येतांना दिसला. पोली सांनी टेकाडी पुलाजवळ ट्रक ला थांबवुन पाहणी केली असता ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात वाळु दिसुन आली. ट्रक चालक महेश छान नेवारे (वय ३८) क्लिन र मयुर बळीराम मेश्राम (वय २१) दोन्ही रा.बिना संगम खापरखेड़ा यांना वाळु वाहतुकीचे राॅयल्टीची विचार पुस केली असता त्यांनी सांगितले कि वाळु मध्य प्रदेशातुन आणली व वाळु राॅयल्टी दाखवली असता ती राॅयल्टी ७ जुन चे पहाटे ३.१६ पर्यंत वैद्य होती. ट्रक मालक निखिल गभणे (वय ३५) रा. भिलगाव यांचा सांगण्यावरुन ट्रक चालक व क्लीनर हे राॅयल्टीची मुदत संपल्यावर ही अवैध वाळु वाहतुक करतांनी मिळुन आल्याने पोलीसांनी दोन आरोपींना अटक करुन त्याचा जवळुन दहा ब्रास वाळु किंमत वीस हजार रुपये व १२ चाकी ट्रक किंमत तीस लाख रुपये असा एकुण तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला पोलीस हवा. मुकेश दिंगाबर रामेलवार यांचा तक्रारी वरून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर हे करित असुन ट्रक मालका चा शोध घेत आहे.