संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत दक्षिणेस सात कि मी अंतरावर मौजा सिहोरा शेत शिवारात कन्हान नदी काठावर लावलेली काॅमटन ग्रीव्ही कंपनीची ३ एच पी पावर ची मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार कलवींदरसिंग सुरजितसिंग चाना वय ५१ वर्ष राह. मोदी नंबर एक कामठी यांची मौजा सिहोरा शिवारात वडिलोपार्जित ३२ एकड शेती असुन ती शेती ४ भाऊ मिळुन करीत आहे. त्या शेती ला पाणी देण्यासाठी कलवीदरसिंग सुरजितसिंग चाना यांच्या शेतीच्या बाजुला कन्हान नदी काठावर मोटार लावुन शेतीला पाणी घेत असतात. ती मोटार २०१० ला नागपुर येथील एक्स बक्सो अँण्ड कंपनी च्या दुका नातुन काॅमटन ग्रीव्ही कंपनीची ३ एच पी पावर ची विधृत मोटार विकत घेतली होती. ती मोटार कलवींदर सिंग चाना हयानी कन्हान नदी काठावर नेहमी करिता लावली होती. शेतीत दिवसा कलवीदरसिंग चाना हे आपल्या कुटुंबासह राहत होते व रात्री घरी जात होते. सोमवार (दि.६) जुन ला सकाळी ७ वाजता पासुन ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत ती मोटार लावली असुन ती चालु होती. त्यानंतर मोटार बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी मंगळवार (दि.७) जुन ला कलवींदर सिंग चाना हे दुपारी २ वाजता शेतात जाऊन मोटार सुरू करण्यासाठी गेले असता नदी काठीवर लावलेली मोटार दिसली नाही. काॅमटन ग्रीव्ही कंपनी ३ एचपी पावरची विधृत मोटार किंमत ५,००० रूपयाची कोणी तरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसां नी फिर्यादी कलवींदरसिंग सुरजितसिंग चाना यांच्या तोंडी तक्रारीने अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ३५०/ २२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे.