पिस्टल, तीन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

नागपुर – गुन्हे शाखा युनिट क्र. ४  चे पथक  हे आरोपीतांचे शोधात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त  बातमीदारामार्फ मत मिळालेल्या माहितीवरून दि.15.03.2022 रोजी 10.15 वा ते 12.55 वा दरम्यान आरोपी नामे सतिश कृष्णराव बोकडे वय 52 वर्ष रा. प्लॉट नं. 32 सी रमना मारेाती नगर पो.स्टे. नंदनवन, नागपूर हा कोणतीही अधिकृत परवाना नसतांना अग्निशस्त्र व धारदार लोखंडी हत्यार जवळ बाळगतांना मिळुण आला. त्यामुळे नमुद  ईसमाचे हे कृत्य कलम भारतीय हत्यार कायदा कलम 3,4,25 तसेच  सह पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने सहकलम 135 महा.पोलीस कायदा अन्वये होत असल्याने त्यास त्याचे राहते घरून ताब्यात घेवून पो.स्टे.नंदनवन येथे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे ताब्यातील 1) 25,000/- रु. -एक लोखंडी मॅग्झीनसह, देशी बनावटी पिस्टल, 2) कि. 900/- रु. -तिन जिवतं काडतुस पिवळया धातुचे, नमु द इसमा समक्ष त्याचे घराची झडती घेतली असता खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुण आला. 3) किमती 10000 /- रू. -एक ओपो कंपनीचा लाल काळया रंगाचा अँन्ड्राईड मोबाईल 4) किमती 200 /- रू. -लोखंडी जुने वापरते दोन मोठे चाकु असा एकूण किंमत अंदाजे 36,100/- रू. रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) सुनील फुलारी यांचे निर्देशान्वये पोलीस उपायुक्त (डिटेक्शन )  चिन्मय पंडीत,  सहाय्यक पोलीस आयुक्त ( डिटेक्शन )  रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ओमप्रकाश सोनटक्के व पथकातील अमंलदार पो.हवा बबन राऊत, नापोशि. निलेश ढोणे, नापोशि.. बजरंग जुनघरे, नापोशि..युवानंद कडु, नापोशि. दिपक चोले, पोशि महेश काटवले, चालक पोशि लीलाधर भेंडारकर, पोशि श्रीकांत मारवडे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महसूल प्रशासनाने जप्त केले अवैध 10 ब्रास वाळू जप्त

Wed Mar 16 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 16 : –नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुमथळा परिसरातून विना रॉयल्टी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक चालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून प्रत्येकी ट्रक मध्ये भरून असलेली 5 ब्रास वाळू असा एकूण दोन्ही ट्रक मधील 10 ब्रास वाळू जप्त करण्याची यशस्वी कार्यवाही आज सकाळी 8 दरम्यान केली. या कार्यवाहितुन ट्रक क्र एम एच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com