संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
एकास अटक, 16 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कामठी ता प्र 7:- विना परवाना अवैधरित्या मध्यप्रदेशातून आयसर ट्रकमध्ये जनावरे कोंबून कामठी येथील भाजी मंडी परिसरातील अवैध कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी जनावरे भरून जात असलेला ट्रक नवीन कामठी पोलीसानी राष्ट्रीय महामार्ग वरील लिहीगाव शिवारातील खांडेकर पेट्रोल पंपा समोर शुक्रवारला सकाळी साडेदहा वाजता सुमारास पकडून 24 जनावरांना जीवदान देऊन एका आरोपीस अटक करून 16 लाख 60 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली . नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित नीरज भगत वय 25 राहणार पिवळी नदी नागपूर याने आयशर ट्रक क्रमांक एम एच 40 एन 5676 मध्ये बिना परवाना अवैधरीत्या मध्य प्रदेशातून 24 जनावरे निर्दयतेने कोंबून भाजी मंडी परिसरातील अवैध कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील लिहीगाव शिवारातील खांडेकर पेट्रोल पंपा समोर नवीन कामठी पोलिसांनी जनावरे भरलेला ट्रक चालकासात दाखवून गाडी थांबऊन ट्रकची तपासणी केली तर ट्रकमध्ये 24 जनावरे निर्दयतेने बांधून दिसून आली जनावरे भरलेला ट्रक नवीन कामठी पोलीस स्टेशनला आणून जनावरे नवीन कामठी येथील गोरक्षणालयात सुरक्षित ठेवून आरोपी सुमित निरज भगत वय 25 यास याचे विरोधात कलम 11 (1) (ड )(च) प्राण्यांना निर्देशाने वागणूक देणे कायदा 1960 , सह कलम 83 ,177 मोटर वाहन कायदा व 34 ,109 भादवी नुसार गुन्हा दाखल करून अटक केली त्याचे जवळून 24 जनावरांची किंमत व गाडीची किंमत एकूण 16 लाख 60 हजार 600 रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला , जनावर व गाडी मालक जावेद खान यांचा पोलीस शोध घेत आहे वरील कारवाई पोलीस उपयुक्त श्रवण दत्त, सहायक पोलीस आयुक्त पी एन नरवाडे ,नवीन कामठीचे ठाणेदार भरत क्षीरसागर यांचे मार्गदर्शनात दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे ,संदीप सगणे ,संदेश शुक्ला, कमल कनोजिया ,अनिकेत सांगणे, प्रभुदास भगत यांच्या पथकाने केली