महसूल प्रशासनाने जप्त केले अवैध 10 ब्रास वाळू जप्त

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 16 : –नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुमथळा परिसरातून विना रॉयल्टी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक चालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून प्रत्येकी ट्रक मध्ये भरून असलेली 5 ब्रास वाळू असा एकूण दोन्ही ट्रक मधील 10 ब्रास वाळू जप्त करण्याची यशस्वी कार्यवाही आज सकाळी 8 दरम्यान केली.
या कार्यवाहितुन ट्रक क्र एम एच 35 ए ए 1233,व एम एच 40 वाय 9761 मधील प्रत्येकी 5 ब्रास वाळू असे एकूण 10 ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली.ही यशस्वी कारवाहो तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ परिविक्षाधीन नायब तहसीलदार राजेश माळी,मंडळ अधिकारी संजय अनव्हाने,तलाठी विनोद डोळस,नितीन उमरेडकर व काशिनाथ भेंडे यांनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com