पेट्रोल पंप वर उभ्या ट्रक च्या १० बँटरी चोरी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ५ कि मी अंतरावर बोरडा रोड कांद्री रूद्रा पेट्रोल पंप समोर उभ्या असलेल्या ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने १० बॅटऱ्या ७० हजार रूपये किंमती च्या चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
          प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१९) मार्च चे सकाळी ८ वाजता दरम्यान राजेश प्रभाकर हुड राह रायनगर कन्हान हा आपल्या घरी हजर असता सुपर वाइजर यांनी फोन करून सांगितले कि, कांद्री-बोरडा रोड वरील रुद्रा पेट्रोल पंप वर शुक्रवार (दि.१८) मार्च चे रात्री ८ ते शनिवार (दि.१९) मार्च २०२२ ला सका ळी ८ वाजता दरम्यान ४० ते ५० ट्रक उभे होते. त्या तील पाच ट्रक च्या १० बॅटऱ्या अँमरान कंपनीच्या किंमत प्रत्येकी ७,००० रुपये प्रमाणे एकुण ७०,००० रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी राजेश प्रभाकर हुड च्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Next Post

आज्ञाचक्र य मस्तक में तिलक लगाने का धार्मिक और वैज्ञानिक कारण!

Mon Mar 21 , 2022
नागपुर –  हमारे माथे के बीचों-बीच आज्ञाचक्र होता है। जो इड़ा, पिंगला तथा सुभुम्ना नाड़ी का संगम है। तिलक हमेशा आज्ञाचक्र पर लगाया जाता है, जोकि हमारा चेतना केंद्र भी कहलाता है। जिसमे वैज्ञानिक दृष्टिकोण से चंदन का तिलक लगाने से मस्तिष्क में शांति, तरावट तथा शीतलता बनी रहती है। इससे दिमाग में सेटाटोनिन व बीटाएंडारफिन नामक रसासनों का संतुलन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com