संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सर्प दंश झाल्यावर अंधश्रध्देला बळी न पडता रूग्णालयात उपचार करा
कन्हान :- घाटरोहणा येथे शेतात काम करताना महिलेचा पाय घोणस सापावर पडल्याने सापाने महिलेच्या पायाला दंश केल्यावर गावक-यानी रूगणालयात न नेता अंधश्रध्देला बळी पडुन ढोगी बाबाकडे नेल्याने वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने घरच्या लोकांनी सर्पमित्रा च्या मदतीने त्वरित शासकिय मेयो रूग्णालयात दाखल करून योग्य उपचारामुळे ती महिला आता धोक्याच्या बाहेर आहे.
नागपुर जिल्ह्यातील तालुका पारशिवनी येथील घाटरोहणा गावातील धक्का दायक घटना सामोर आली की, शुक्रवार (दि.१) मार्च २०२४ ला एक ३५ वर्षिय महिला सुनिता संतोष रखसे या दुपारच्या वेळी शेतात काम करित असतांना त्यांचा घोणस (Russel viper) या विषारी सापावर पाय पडला. सापाने त्यांच्या पायाला चावा घेतला. त्यानंतर घडलेला प्रकार आज ही विचार करण्यास भाग पाडते. तेथील गावक ऱ्यांनी साप दंश झालेल्या महिलेला कोणत्याही रुग्णा लयात दाखल न करता अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन ते त्या महिलेला कुठल्यातरी ढोंगी बाबा कडे सापाचे विष उतरविण्या करिता घेऊन गेले. यामुळे योग्य उपचार मिळण्यास उशीर झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने घरच्या लोकांनी सर्पमित्र राम जामकर यांना संपर्क केला असता त्यांनी रूग्णाला ताबडतोब नागपुर च्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रूग्णाला ताबडतोब शासकिय मेयो रूग्णालयात नागपुर येथे दाखल करण्यात आले. आणि वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान (नागपुर) चे सचिव राम जामकर व वैभव लक्षणे तसेच वाइल्ड लाइफ वेल्फर सोसाइटीचे नितेश भांदक्कर यांच्या साहाय्याने डॉक्टरांनी योग्य औषधोपचार करण्यात आल्याने इतक्या गंभीर परिस्थितीतुन ती महिला आता धोक्याच्या बाहेर आहे.
आजच्या आधुनिक युगातही ग्रामिण भागात लोक अंधविश्वास आणि अंधश्रद्धेला बळी पडतात. आणि आपला जीव गमावतात. असे काहीही उपचार न घेता सरळ रुग्णालयाकडे धाव घेऊन योग्य उपचार करण्यात यावा. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अशी माहिती सर्पमित्र राम जामकर व नितेश भांदक्कर हयांनी दिली आहे.