संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- कामठी तालुक्यात नुकत्याच झालेल्या संततधार अतिवृष्टी पावसामुळे कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे , त्या अनुषंगाने कामठी तालुक्यातील जास्त प्रभावीत असलेले गावे कवठा,म्हसाळा -खसाळा,पावनगाव, सोनेगाव,गुमथळा,महालगाव,शिवणी,जाखेगाव, सेलू, चिकना,भमेवाडां या गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच नागनदीच्या काठावरील सर्व गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच 14 जुलै ला कोराडी औष्णिक विद्दुत केंद्राचा राखेचा बंधारा फुटल्यामुळे 46 हेक्टर जमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त भागाची माजी जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर तसेच कामठी तालुक्यातील जनप्रतिनिधी यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या.
तेव्हा कोराडी औष्णिक विद्दुत केंद्राच्या राखेचा बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसांनग्रस्तांना शासनाने तसेच औष्णिक विद्दुत केंद्राने नुकसांनभरपाई देण्यात यावी तसेच शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी सत्तापक्ष नेता व जी प सदस्य प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाडे, जि.प. सदस्य दिनेश ढोले , पंचायत समिती उपसभापती आशीष मल्लेवार, अनिकेत शहाणे , कुनाल इटकेलवार ,, दिलीप वंजारी,सुमेध रंगारी , दिक्षाताई चनकापुरे,, सोणुताई कुथे , आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.