संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- कामठी शहरातील सखल भागात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी गोरगरीबांच्या घरात शिरून अन्न धान्याचे नुकसान झाले नगर परिषद सी ओ श्री संदिप बोरकर यांनी त्यांच्या टीम सह घरोघरी जाऊन पाहणी केली परंतु महसूल विभागाने नुकसान भरपाई चे अर्ज अद्यापही भरले नाहीत.
भाजपा कामठी शहर पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई साठी शासना कडून मदती साठी पंचनामे करण्याची मागणी केली.
यावेळी भाजपा पदाधिकारी संजय कनोजिया,लालसिंग यादव, उज्ज्वल रायबोले, राज हडोती,पंकज वर्मा, प्रमोद वर्णम,देवानंद देशमुख,कामरान हैदरी उपस्थित होते.