सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 233 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (११) रोजी शोध पथकाने २३३ प्रकरणांची नोंद करून ८४५०० रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघवी करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ७८ प्रकरणांची नोंद करून रु ३१२०० रुपयांचा दंड वसुल केला. सर्वाधीक ३३ प्रकरणे लक्ष्मीनगर झोन, २० प्रकरणे गांधीबाग झोन, आणि ७ प्रकरणे मंगळवारी झोन मध्ये नोंद झाले. सगळयांवर प्रत्येकी रु ४०० प्रमाणे दंड लावण्यात आला.

कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत ५३ प्रकरणांची नोंद करून ५३०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत ३४ प्रकरणांची नोंद करून रु १३६०० दंड वसूल करण्यात आला. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 1000/- दंड) या अंतर्गत आशीनगर झोन मध्ये एक केस ची नोंद करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणे (रु. 1000/- दंड) मंगळवारी झोन मध्ये एक केस नोंद करण्यात आला. या व्यतिरिकीत इतर ४२ व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून ८४०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उपद्रव करणा-या संस्थांकडून २३ प्रकरणांमध्ये २३००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com