पक्षांनी केंद्रस्तरावर प्रतिनिधी नेमून मतदार वाढविण्यासाठी सहकार्य करावे – डॉ.पंकज आशिया

Ø जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षांसोबत बैठक

Ø जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

Ø 20 ऑगस्टपर्यंत आक्षेप, हरकती स्वीकारणार

यवतमाळ :- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. मतदानाच्या प्रक्रियेत प्रत्येकास सहभागी करून घेण्यासाठी नावे मतदार यादीत असणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांनी बुथस्तरावर प्रतिनिधी नियुक्त करून नोंदणी वाढविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.

जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी दि.6 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांसोबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, विविध राजकीय पक्षांचे अनील गायकवाड, पी.एम.चव्हाण, भावना लेडे, पवन अराठे, तुषार देशमुख, डॉ.भिमराव गणवीर आदी उपस्थित होते.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीनुसार जिल्ह्यात एकूण 21 लाख 90 हजार 944 मतदार आहेत. सर्वात जास्त मतदार यवतमाळ विधानसभा मतदार संघात असून सर्वात कमी मतदार उमरखेड मतदारसंघात आहेत. नवीन मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्ती करण्याकरिता तसेच आक्षेप व हरकती दाखल करण्याकरिता दि.6 ते 20 ऑगस्ट पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. या दरम्यान मतदारांना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द यादी तसेच व्होटर हेल्पलाईन ॲपवर आपल्या नावांची खात्री करता येतील. यादीवर आलेले आक्षेप, हरकतींवर कारवाई करून ⁠अंतीम मतदार यादी दि.30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

⁠लोकसभा निवडणुकीच्यावेळी जिल्ह्यात एकूण 2 हजार 527 मतदान केंद्रे होती. पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून त्यामध्ये 51 नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आले. आता जिल्ह्यात एकूण 2 हजार 578 मतदान केंद्रे झालेली आहेत. ⁠याचबरोबर काही मतदान केंद्रांच्या ईमारती व ठिकाण तसेच काही मतदान केंद्राच्या नावात बदल करण्यात आला आहे. मतदारांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजकीय पक्षांनी संबंधित केंद्रावरील मतदारांना आपल्या स्तरावर याबाबत जनजागृत करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

मतदान केंद्रांवर विशेष शिबिर

मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. दि.20 ऑगस्ट पर्यंत नवीन मतदारांना आपली नोंदणी करता येणार आहे. सोबतच नावात, पत्त्यात दुरुस्ती, नावे वगळणे आदी करता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दि.10 व 11 ऑगस्ट तसेच दि.17 व 18 ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रारूप मतदार यादीसह उपस्थित राहणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणच्या 4 लाखावर अर्जांची छाणणी

Thu Aug 8 , 2024
Ø अर्जांच्या छाणणीचे काम युद्धस्तरावर Ø तालुकास्तरावर 25 कर्मचाऱ्यांचे पथक Ø आतापर्यंत 4 लाख 62 हजार अर्ज दाखल यवतमाळ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रशासकीय स्तरावर अर्ज छाणणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. प्रत्येक तालुक्यात यासाठी विविध विभागातील 25 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक काम करत आहे. योजनेसाठी आतापर्यंत 4 लाख 62 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी आतापर्यंत 4 लाखावर अर्जांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com