भुगाव च्या काका आणि पुतणीचा रस्ता अपघातात जागीच मृत्यू ..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-मौदा रामटेक मार्गावरील घटना

 मौदा :- मौद्याकडून रामटेकला जाणाऱ्या टिप्परने धडक दिल्यामुळे कामठी तालुक्यातील भुगाव रहिवासी काका आणि-पुतणी यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील भूगाव येथील रहिवासी शिवदास वंजारी (50) आणि त्यांच्या लहान भावाची मुलगी श्रुती भीमराव वंजारी (16), शिवदास यांची पत्नी रेखा वंजारी हे तिघेही फॅशन प्रो वाहन क्रमांक एमएच-40 मधून -7281 हे त्यांचे नेरला ता.मौदा जी.नागपूर येथील रहिवासी नातेवाईकाकडे

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जात होते, त्याच दरम्यान यांच्या वाहनाला पाठीमागून आलेल्या एमएच-40-एके-0285 या टिप्परने ओव्हरटेक केला आणि धडक दिली. टिप्परला धडक दिली, त्यामुळे फॅशन प्रो कारमधून हे तिघेजण पडले आणि शिवदास वंजारी आणि श्रुती वंजारी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवदास वंजारी यांच्या पत्नी रेखा या पती व भाचीच्या डोळ्यासमोर अपघात झाल्याने बेशुद्ध पडल्या, त्यांना मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर उपचार सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्त्या निर्मला शिवदास जार्वेकर व भारती गायकवाड यांनी मौदा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली, त्यानंतर खरे यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद चौधरी यांनी पंचनामा केला व दोन्ही मृतदेह मौदाच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी करीत आहेत.

Next Post

इलेक्ट्रिक खांबावरून पडल्याने ठेकेदार कामगाराचा मृत्यू..

Sun Jun 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 4 :-अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धनी या गावात इलेक्ट्रिक खांब सरळ करण्याचे व तार लावण्याचे काम सुरू असताना अचानक इलेक्ट्रिक कार लावण्याचे काम करण्याकरता इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या धनराज सहदेव समर्थ वय 35 वर्षे मुक्काम गोसावी मांगली यांचा पाय घसरल्यामुळे ते खांबावरून खाली पडले व जागीच मृत्यू झाला. त्यावेळी विद्युत वितरण कंपनीचे इंजिनिअर […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com