नागपूर :-पाली व बौद्ध अध्ययन क्षेत्राची व्याप्ती महासागरा सारखी आहे. ह्या क्षेत्रात अजूनही पाहिजे तेवढे काम झाले नाही. साधे वंदनेचे पुस्तक हाती घेतले तर त्यात शंभरहून अधिक चुका मिळाल्या शिवाय राहणार नाही. अजूनही पंचशिलातील आदिन्नादान आपण नीट म्हणत नाही. आपण आदिन्नदानाच म्हणतो. पाली व्याकरण क्षेत्रात माझा विशेष उत्साह असल्यामुळे मी या क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ह्या क्षेत्रात पाली संशोधकांनी व विद्वानांनी लक्ष घालावे. आधुनिक काळाशी मेळ घालून पाली व बौद्ध अध्ययनशी कशी सांगड घालता येईल यावर विद्वानांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी पाली क्षेत्रासाठी संपूर्ण समर्पण देणे आवश्यक आहे.
आमच्या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या माध्यमातून सोशल एंगेज बुद्धिझम पाली व सायकॉलॉजी या विषयावर ऑनलाईन सत्र चालतात. या सत्राच्या माध्यमातून परदेशी विद्वानांशी आपण चर्चा करू शकता व त्याच्या ज्ञानाचा फायदा घेऊ शकता. पाली व बौद्ध ध्यानाचे क्षेत्र विशाल महासागरा सारखे आहे आपण जेवढे ज्ञान संपादन करता येते तेवढे ज्ञान संपादन केले पाहिजे. असे मत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ महेश देवकर यांनी व्यक्त केले. दोन्ही डोळ्यांनी अंध (दिव्यांग) असलेले प्रो डॉ महेश देवकर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथील पाली व बौद्ध अध्ययन विभागातील व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी पाली विभागाच्या प्रा डॉ तुळसा डोंगरे ह्या होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुजित वनकर बोधी यांनी तर समारोप प्रा सरोज वाणी यांनी केला. पाहुण्यांचे स्वागत शिक्षकांच्या वतीने प्रा डॉ रेखा बडोले यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने उत्तम शेवडे, विजय वासनिक, अलका जारोंडे, ऋचा जीवने यांनी केला. पाली चे विद्यार्थी व डॉ आंबेडकर विचारधारा चे संशोधक उत्तम शेवडे ह्यांनी डॉ देवकर ह्यांना कांशीरामजींच्या दृष्टीतुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही इंग्रजी पुस्तिका भेट म्हणून दिली.
याप्रसंगी प्रामुख्याने पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील शुभांगी वासनिक, आशा खाकसे, डॉ सतीश नगरारे, विजय धाबर्डे, किशोर मेश्राम, हिरालाल मेश्राम, दिलीप गायकवाड, डॉ वासुदेव बारसागडे, ए ए सहारे, पी एम भोयर, ज्योती खोब्रागडे, बी पी मेश्राम, सिद्धार्थ फोपरे, सुरेंद्र पझारे, चंदा बुरबुरे, किशोर ढोक, कविता जनबंधू, जे आर बारसागडे, रमा शिंगाडे, विजय जागळेकर, खडसे आदी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.