पालघर जिल्हा परिषदेचा अखर्चित निधीला फेब्रुवारी २०२४ पर्यंत खर्च करण्यास परवानगी – ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन

नागपूर :-  सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या वित्तीय वर्षांमध्ये पालघर जिल्हा परिषदेला प्राप्त एकूण निधी पैकी काही निधी अखर्चित राहिला असून सदर अखर्चित निधी खर्च करण्यास वित्त विभाग, शासन निर्णय दि. १६ ऑक्टोबर २०२३ अन्वये फेब्रुवारी २०२४ पर्यंत परवानगी देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषद मध्ये दिली.

पालघर जिल्हा परिषदेचा कोट्यावधीचा निधी परत गेल्याबाबतचा प्रश्न सदस्य सर्वश्री डॉ.मनिषा कायंदे, निरंजन डावखरे आदींनी उपस्थित केला होता.त्यावेळी महाजन बोलत होते.

यावेळी महाजन म्हणाले, पालघर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत विभाग, लघु पाटबंधारे विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग तसेच कृषी विभाग या विभागांचा निधी अखर्चित आहे.सन २०२०-२१ दरम्यान कोविड -१९ संसर्ग,लाकडाऊन झाल्यामुळे अनेक कामांची मंजुरी, निविदा प्रक्रिया व अ़ंमलबजावणी करिता विलंब झाला.तसेच काही तांत्रिक कारणांमुळे निधी अखर्चित राहिला.सन २०२१-२२ मध्ये ९४.५५ टक्के निधी खर्च झालेला असल्याची माहिती महाजन यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मीरा भाईंदर क्षेत्रात कॅन्सर रुग्णालयासाठी निधी कमी पडू देणार नाही - मंत्री उदय सामंत

Sat Dec 9 , 2023
नागपूर :- मुंबई महानगर क्षेत्रातील रुग्णांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याबाबत सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री  सामंत बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com