सायबर असुरक्षिततेला मात देण्यासाठी : परस्परांना जोडणाऱ्या जगात लवचिकता निर्माण करणे

नवी दिल्ली :- सामाईक सेवा योजना (सीएससी) आणि युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूटने यांनी संयुक्तपणे आज नवी दिल्लीत सायबर सुरक्षा परिषद आयोजित केली होती. या दरम्यान सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली.

सायबर सुरक्षा ही गंभीर आणि संवेदनशील बाब आहे. जगभरात सायबर धोके वेगाने वाढत आहेत, तसेच प्रतिवर्षी डेटा उल्लंघनाच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादारांकडून सायबर सुरक्षा उल्लंघनाच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत आहे.कंपन्यांनी त्यांचे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी मजबूत सायबर सुरक्षा फ्रेमवर्क राखणे महत्त्वाचे आहे. डेटा सुरक्षेतील कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनामुळे विश्वास आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याव्यतिरिक्त इतर मोठे नुकसानही व्यवसायात होऊ शकते.

या परिषदेचे उद्घाटन करताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन म्हणाले, “तंत्रज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्यात सीएससी महत्त्वाची भूमिका बजावते. सुरक्षितता ही केवळ प्रणालींची नसून वर्तन, ज्ञान आणि सवयींविषयी देखील आहे. आमच्या समोरील एक प्रमुख जोखीम हा अंतिम वापरकर्ता आहे जो सायबर संरक्षणाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करू शकतो, अनेकदा पिन नंबर शेअर करतो आणि असुरक्षितता वाढवतो.”

एस कृष्णन पुढे म्हणाले, “फसवणूकीला बळी पडू नये यासाठी प्रत्येकाने सायबर धोक्यांविषयी जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. वर्तनात्मक आणि सवयी लक्षात घेत आपण प्रभावीपणे जनजागृती करु शकतो. या परिषदेद्वारे, आमची सायबर संरक्षण धोरणे मजबूत करण्यासाठी लागू करता येणारे नवीन उपाय जाणून घेणे हे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.”

सीएससी-एसपीव्हीचे महाव्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय राकेश म्हणाले, “ही परिषद आम्हाला सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी उपयुक्त मार्गांची चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत असून मजबूत डेटा व्यवस्थापन, सायबर धोके आणि चोऱ्या रोखण्याविषयी धोरणांवर लक्ष केंद्रित करणे,हा या परीषदेचा उद्देश आहे. सायबर थिंक टँक विकसित करून, नाविन्यपूर्ण उपायांना चालना देण्याचे आणि अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी अनुकूल सायबर प्रणाली तयार करणे हे आमचे ध्येय आहे.”

यावेळी सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी सीएससी आणि युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला.

सीएससी एसपीव्ही बद्दल:

सीएससी ही डिजिटल इंडिया मिशनचा अविभाज्य भाग आहेत. सीएससी भारतातील ई-सेवांसाठी सहाय्य करत , सुशासन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शुक्रवारी बाजारातुन 50 हजार रुपये गेले चोरीला

Sat May 25 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागील काही दिवसांपासून जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आठवडी दिवस असलेल्या शुक्रवारी बाजारातुन हातचालाखीने महिलेच्या पर्स मधून पैसे चोरी होणे हे नित्याचेच झाले आहे मात्र आज गांधी चौकातील एका रहमान कुलर नामक दुकानातील एका कर्मचाऱ्यांच्या पिशवीत ठेवलेले 50 हजार रुपये तीन अज्ञात महिलांनी हात चलाखीने चोरून नेल्याची घटना आज दुपारी 1 वाजता घडली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com