नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत कैकाडी नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी देवशाला तात्याराव गायकवाड, वय ४६ वर्षे, व आरोपी क. १) बबल्या राम गायकवाड वय २५ वर्ष २) आदित्य राम गायकवाड वय २० वर्ष ३) राम गणपत गायकवाड वय ४५ वर्ष ४) इंदु राम गायकवाड वय ४० वर्ष ५) दिपाली बबल्या गायकवाड वय १९ वर्ष, सर्व रा. कैकाडी नगर, नाल्या जवळ, नागपुर ६) समीक्षा अमीत येरेवार, वय २६ वर्ष, रा. अजनी, नागपूर यातील आरोपी क. १ ते ५ व फिर्यादी शेजारी शेजारी राहत असुन फिर्यादीचा मुलगा अभिषेक व आरोपी कं. १ वाचा कोरोनाचे कालावधीमध्ये अपघात झाला होता, त्या अपघातामध्ये फिर्यादीचा मुलगा जखमी झाल्याने उपचाराचा खर्च आरोपी क. १ हा देणार होता. त्यामुळे त्यांनी आपसात समझौता करून पोलीस ठाणेला तकार दिली नव्हती, परंतु आरोपी क. १ ने उपचाराचे पैसे दिले नाही म्हणून फिर्यादी व आरोपी मध्ये नेहमी भांडण व वादविवाद व्हायचे. याच कारणावरून यातील आरोपी क. १ ते पाहिजे आरोपी क. ७) विक्की सायमन जॉर्ज रा. राहटेनगर टोळी, नागपूर यांनी संगणमत करून फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा अभिषेक यांना जिवानीशी ठार मारण्याकरीता लोखंडी रॉड व तलवारीसह आले असता, आरोपी क. १ ने फिर्यादीचे मुलास तलवारीने मारत असता फिर्यादी हीने मुलास धक्का दिल्याने तलवारीचा वार चुकला फिर्यादी ही जिव वाचविण्याकरीता पळुन जात असतांना, आरोपी क. १ ने आरोपी क. २ ते ७ यांना उचकावुन फिर्यादी व त्यांचे घरचे लोकांना जिवानीशी ठार मारण्याकरीता सांगत होता. आरोपी क. १ ने फिर्यादी यांचे मागे धावुन तिला तलवारीने हातावर मारून जखमी केले, याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे आरोपींविरुध्द कलम १०९, ११५(२), ३३३, १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(४), ३२४(५) भा.न्या. सं. सहकलम ४/२५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून तपास करून वेळोवेळी आरोपी क. १ ते ६ यांना अटक करण्यात आली होती. आरोपी क. ७ हा मिळून आला नव्हता.
गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा सोनसाखळी पथकाचे चे अधिकारी व अंमलदार यांना दिनांक २६.०९. २०२४ रोजी मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून, सापळा रचुन गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे विक्की सायमन जॉर्ज, वय २७ वर्षे, रा. राहटे नगर टोळी, रामेश्वरी रिंग रोड, अजनी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता. त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीचा अभिलेख तपासला असता तो पोलीस ठाणे बेलतरोडी येथील दाखल असलेले दोन गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीस पुढील कार्यवाही कामी बेलतरोडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी राहुल माकणीकर पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि. सपोनि, मयुर चौरसिया, पोउपनि, अनिल इंगोले, पोहवा. प्रफुल मानकर, संतोष गुप्ता, मनिष कुरडे, संदीप भोकरे, कुणाल लांडगे, पंकज हेडाऊ, संदीप पडोळे यांनी केली.