समता पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली :- सामाजिक न्याय विभागाने दिनांक 10 एप्रिल 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये “समता पंधरवडा” अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत असून या संदर्भात माहिती गडचिरोली जिल्हयातील सर्व लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आयोजन करणेबाबत आयुक्त, समाज कल्याण, म.रा.पुणे, व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी निर्देश दिलेले आहे.

समितीस दिनांक 29 मार्च 2024 पर्यंत प्राप्त झालेले जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव निकाली काढण्यात आलेले आहेत (त्रृटीचे प्रकरणे वगळून). परंतु ज्यांना आजपावेतो जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, असे प्रकरणे त्रृटी मध्ये असनू प्रस्तावातील त्रृटी पुर्तता न झाल्याने व जात व अधिवासाचे सक्षम पुरावे सादर न केल्याने असे प्रस्ताव समितीच्या निर्णयार्थ प्रलंबीत आहेत. अशा सर्व अर्जदारांकरीता दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी त्रृटींची पुर्तता करण्यासाठी “समता पंधरवडा” च्या अनुषंगाने विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व दस्ताऐवजाच्या छायांकित व मुळ प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय.चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रेयसीने केला प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून?

Wed Apr 24 , 2024
– साखरपुड्यासाठी हवे होते पैसे – दुपारी फोन करणारा तो व्यक्ती कोण?  नागपूर :- हुडकेश्वरमधील एका भूखंड विकासक असलेल्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर आढळून आल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली. मात्र, त्या व्यक्तीचे गुप्तांग ठेचून खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रेयसीनेच काही साथिदारांच्या मदतीने खून केल्याची चर्चा जोरात आहे. रवी (५२) हुडकेश्वर असे खून झालेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com