संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – भारतीय टपाल विभाग प्रवर अधीक्षक डाकघर नागपूर कामठी विभागाचे वतीने “भारतासाठी व्हिजन 2047 या संकल्पनेतून – ढाई अक्षर ” या विषयावर राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत पत्रलेखन स्पर्धेचा कालावधी 1 जुलै ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहणार असून पत्र लेखनाची भाषा हिंदी ,इंग्रजी राहील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय 18 वर्षाचे आत असावे ,1000 अक्षरात पत्रलेखन पूर्ण करायचा असून स्व हस्तलिखित असावे स्पर्धेचा अंतिम निकाल 25 डिसेंबर 2022 ला जाहीर करण्यात येणार आहे विभाग व राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 25 हजार रुपये द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये व तृतीय पुरस्कार 5000 रुपये रोख पुरस्कार , प्रशस्तीपत्र दिले जाणार असून या स्पर्धेत ग्रामीण भागातील तरुणांनी जास्तीत जास्त स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर कामठी नागपूर विभागाचे वतीने केले आहेत.