छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज, जि. गडचिरोली येथे शुक्रवार दि. 26 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे” आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून जे. पी. लोंढे उपविभागीय अधिकारी देसाईगंज, डॉ. कुलभूषण रामटेके मुख्याधिकारी नगरपरिषद देसाईगंज, किरण एच. रासकर पोलिस निरीक्षक, वडसा, अविनाश पिसाळ नायब तहसिलदार, देसाईगंज तसेच विशेष अतिथि म्हणून राजू एम. मुंडे प्रबंधक भारतीय स्टेट बँक वडसा, आफताब आलम खान व्यवस्थापक ए.ए. एनर्जी लि. वडसा, डॉ.अविनाश मिसार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वडसा व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधि, व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र, कृषि क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी, आयटीआय तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, उच्च शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार व शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जांच्या विविध योजनेविषयी बँकेचे अधिकारी सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये नोकरीच्या विविध संधी आणि अग्निवीर योजनेविषयी माहिती दिली जाणार आहे.

शिबीर स्थळी प्रदर्शन लागणार असून, त्यात संस्थेतील विविध व्यवसायांविषयी माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार आणि कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्याच्या विकासात आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची - राज्यपाल रमेश बैस

Tue May 23 , 2023
सातारा :- राज्याच्या सर्वांगीण विकासात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने शासकीय यंत्रणांनी विकासकामे करण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्या. राजभवन महाबळेश्वर येथे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांसोबत राज्यपालांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलिस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com