चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 

नागपूर : विभागीय महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त कार्यरत शासकीय व स्वयंसेवी बाल विकास संस्था मधील अनाथ, निराधार बालकांच्या सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 1 ते 3 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ग्रामीण पोलिस मुख्यालय नारी रोड येथे करण्यात आले आहे.

बाल महोत्सवाचे उद्घाटन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या महोत्सवामध्ये सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमासह विविध क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात आले आहे, असे महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त ए.जे.कोल्हे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहराचे रुपडे पालटणार ; जी-२० परिषदेच्या आढावा बैठकीत प्रशासनाची तयारी

Tue Jan 31 , 2023
नागपूर : रुंद-स्वच्छ व सुंदर रस्ते, रस्त्याच्या कडेला सुशोभिकरण, विमानतळ परिसराचे सौंदर्यीकरण, चौका-चौकांमध्ये सौंदर्यीकरण, मेट्रो मार्गावर जागविण्यात येणारा महाराष्ट्राचा इतिहास व सांस्कृतिक वैभवाचे चित्र आणि फुटाळा तलावाचा फाउंटन शो आदी कामांना गती आली आहे. या सर्व कामांमुळे नागपूर शहराच्या सौंदर्यात व विकासात भर पडून जी-२० परिषदेचे आयोजन ऐतिहासिक ठरणार असून प्रशासन सज्ज झाले आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com