नागपूर :- शिक्षणात येणाऱ्या नवनवीन बदलाविषयी पालक तथा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या हेतूने क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे तर्फे सातवी ते दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी पुण्यातील तज्ञ वक्त्यांचे विनामूल्य मार्गदर्शन कार्यक्रम 29 जानेवारी सकाळी साडेदहा वाजता धनवटे नॅशनल कॉलेज,नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे .
मुलांना योग्य शिक्षण देणे हीच आजच्या पालकांची प्राथमिकता असून यादृष्टीने या विनामूल्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या मार्गदर्शन शिबिरामध्ये दहावीतील विद्यार्थ्यांचे नवीन परीक्षा पॅटर्ननुसार अभ्यासाचे नियोजन कसे करावे, दहावीनंतर इंजीनियरिंग व मेडिकल व्यतिरिक्त इतर कोणते पर्याय आहेत, आठवी ते दहावी व दहावी नंतर असणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांची माहिती, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षण संस्था आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया आणि अंगभूत गुण व विद्यार्थ्यांना कल याचा विचार करून करिअर कसे निवडावे ,याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन शिबिर मुलांसोबतच त्यांच्या पालकांसाठी देखील महत्त्वाचे आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावे व न चुकता 29 जानेवारी सकाळी साडेदहा वाजता धनवटे नॅशनल कॉलेज मधील कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आयोजकांनी कळवले आहे.