चंद्रपूर :-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर शेतकरी बँक म्हणून ओळखली जाते. खरीप हंगाम सन २०२०-२२ मध्ये दिलेल्या पीक कर्ज वाटपाचे लक्षांक ११० टक्के पूर्ण करून अन्य बँकांच्या तुलनेत प्रथम ठरली होती. खरीप हंगाम २०२२-२३ या वर्षातही सर्वात आधी पीक कर्ज वाटपाला सुरुवात करून आघाडी घेतली आहे.
मोरवा सेवा सहकारी संस्था मोरवाच्या वतीने नुकतेच 157 सभासदांना 1 कोटी 66 लाख 36 हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप केले असून यावेळी सहकारी संस्थेचे अध्यक्ष भगवती पीदूरकर, गट सचिव सुरेश लोणारे, संचालक गणेश दिवसे, गणेश ताजने, रत्नाकर चौधरी, आनंद मिलमिले, जिल्हा मध्यवर्ती बँक ताडाळी शाखाचे व्यवस्थापक सुरेश गणपतराव निखाडे, निरीक्षक रोशन तुरारे, लिपिक सचिन चटकी, शिपाई विजय बिबटे, यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन, मिरची पिकांसाठी मोठ्या प्रमाणात कर्जवाटप होते. कर्जाचे दर प्रति एकर धान २२ हजार २०० कापूस बागायत २८ हजार ५०० कापूस जिरायत २२ हजार ३०० सोयाबीन २१ हजार १०० व मिरची पिकाकरिता ४३ हजार ३०० दर निश्चित करण्यात आला आहे.
नियमित पीक कर्ज व इतर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. शेतकरी हित लक्षात घेऊन शासनाच्या धोरणानुसार निर्णय घेण्यात आला असे मत ताडाळी बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश गणपतराव निखाडे यांनी सांगितले.