कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

धर्मराज शैक्षणिक संस्थेची आग्रही मागणी.

विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या.

कन्हान : – विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विविध शिष्य वृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक अस लेल्या कागदपत्रे तयार करावे लागतात. यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे  भिमराव शिंदेमेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसिलदार पारशिवनी यांच्याकडे केली आहे.
नुकतेच शैक्षणिक सत्र २०२२ – २०२३ ला सुरू वात झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त जाती व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासना तर्फे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती (अज), डॉ बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पुर्व शिष्यवृत्ती (भटक्या विमुक्त व ओबीसी), अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती (सर्व जाती), कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती या सारख्या विविध शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सप्टेंबर महिन्या पर्यंत शाळेत सादर करावे लागते. यासाठी विद्यार्थ्यांना जाती चे प्रमाणपत्र, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखले याची आवश्यकता असते. ही वेळखाऊ प्रक्रि या असल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव साद र करू शकत नाही. त्यामुळे हक्काच्या लाभा पासुन शालेय विद्यार्थी वंचित राहतात.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्रातील आर्थिक लाभाचे नुकसान होऊ नये यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे भिमराव शिंदेमेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने पारशिवनी तहसिलदार सांगळे यांच्याकडे केली. यावेळी शिष्टमंडळात धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पत्रकार धनंजय कापसीकर, कांद्री ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे ग्रामीण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, मुख्याध्यापक संघाचे पदाधि कारी  जितेंद्र भांडेकर यांचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आमगाव येथे चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

Sun Jul 3 , 2022
अमरदिप बडगे – प्रकरण मागे घेण्यासाठी कुटुंबांवर दबाव चर्चा .. – पोलीस ठाण्यात माळी समाज व विविध संघटनांचा मोर्चा.. – गावात तणावाचे वातावरण.. गोंदिया – एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षाच्या चिमुकलीवर चाँकलेट घेण्यासाठी आली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे घडली आहे. दरम्यान ही बाब परीसरातील नागरीक आणि मुलीच्या आईच्या लक्षात येताच हे बिंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com