18 जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक सुट्टी जाहीर

मुंबईदि. 14 : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सामान्य प्रशासन विभागाने सावर्जनिक सुट्टी जाहीर केली आहे.

               मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालयेनिम शासकीय कार्यालयेसावर्जनिक उपक्रमबॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे. राज्यातील ठाणेरायगडरत्नागिरीसिंधुदुर्गपुणेसातारासांगलीसोलापूरनाशिकधुळेअहमदनगरजळगावऔरंगाबादजालनापरभणीबीडलातूरउस्मानाबादनांदेडहिंगोलीअमरावतीबुलढाणायवतमाळवाशिमनागपूरवर्धाभंडारागोंदियाचंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्‍या आणि सांगली-मिरज-कुपवाड या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

Fri Jan 14 , 2022
   मुंबई दि, 14 : 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.               या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी उद्या दि. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com