16 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणेकरीता सुचित केले आहे.त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते. दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सोमवार सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी असे प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार,निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज विहीत नमुण्यात दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येईल.

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली,बॅरेक क्र.1 खोली क्र.26 व 27, कलेक्टर कॉम्प्लेक्स ता.जि. गडचिरोली या कार्यालयात निशुल्क उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी,असे सदस्य सचिव,महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

Thu Jan 12 , 2023
गडचिरोली: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व्दारा विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी वैयक्तीक घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.सदर घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती,गटविकास अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयास अर्ज सादर करावे. विमुक्त जाती,भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!