सामाजिक वनीकरणतर्फे चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

भंडारा :- स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव निमित्त सामाजिक वनीकरण विभाग भंडारा येथे भिंती चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांना वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव वंजारी, प्रमुख अतिथी एस.एन.क्षिरसागर विभागीय वन अधिकारी भंडारा, पी.एन.नाईक वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा, रिजवी वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी, गोवर्धन भोंगाडे, कार्तीकस्वामी मेश्राम वनश्री पुरस्कार प्राप्त, कोयल कार्तीकस्वामी मेश्राम, वर्षा चावरे मुख्य लेखापाल, आर.टी.मेश्राम वनपाल उपस्थित होते. गोवर्धन भोंगाडे व रिजवी वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वनश्री पुरस्कार प्राप्त कार्तीकस्वामी मेश्राम यांनी पर्यावरण विषयी जनजागृती गित सादर करून प्रबोधन केले.

भिंती चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शशांक अरविंद वासनिक, द्वितीय क्रमांक-अशरा रहमतअली मन्सुरी, तृतीय क्रमांक- शौर्य गोपाल वानखेडे तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – दिपाली सुरेश भजनकर, द्वितीय क्रमांक – अनुष्का अनुप दलई, तृतीय क्रमांक – कोमल कैलास राखडे विजेत्यांचे रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, व वृक्ष भेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन पी.एन.नाईक वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा यांनी केले. व आभार एस.आर.दहिवले वनपाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर.टी.मेश्राम वनपाल, एस.एम.जुंबाड वनरक्षक, मिना पटले, बी.बी.मारबते, टी.जी.भिवनकर, अतकरी, राष्ट्रपाल, नेवारे, विनोद वाघमारे यांनी सहकार्य केले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महादूला नगरपंचायत प्रशासनाचा जागेचे पट्टे वाटपात भोंगळ कारभार?

Wed Sep 14 , 2022
संभाजी नगर “आरक्षित जागा” म्हणून नोंद कुणी केली? मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समितीची दुरुस्ती प्रस्ताव पाठविण्याची मागणी नागपूर :- महादूला नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन लोकनेते  चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते केले. त्याप्रसंगी बोलतांना बावनकुळे नी संभाजी नगर सह नगरपंचायत मधील सर्व झोपडपट्टी परिसरातील रहिवासी नागरिकांना मालकी हक्क पट्टे वाटप करण्याचे आदेश दिले. संभाजी नगर, जयभीम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com