मिलिट्री वाहन व टिप्पर अपघातात चार जख्मी.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 ;- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील खैरी जवळील जैस्वाल पेट्रोलपंप समोर कामठीहुन नागपूर कडे जाणाऱ्या मिलीट्री वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक टिप्पर ने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या अपघातात चार जण जख्मी झाले तर या मिलिटरी वाहनांच्या मागेहून येणाऱ्या दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी या मिलिटरी वाहनांच्या समोरच्या चाकात आल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले मात्र या दुचाकीचालकाने आपला जीव वाचविण्याच्या बेतात दुचाकी सोडून बाजुला पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली .

बचावलेल्या या दुचाकीचालकाचे नाव प्रकाश दुर्गे वय 40 वर्षे रा दाल ओली कामठी असे आहे तर हा तिहेरी अपघात गत सकाळी सव्वासात वाजता घडला असून यासंदर्भात जख्मि फिर्यादी शबीन शबमुगण वय 26 वर्षे रा कॅन्टोन्मेंट कामठी ने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी टिप्पर चालक विकास शेंडे वय 39 वर्षे रा अंबाझरी नागपूर विरुद्ध भादवी कलम 279,337,427 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर जख्मी फिर्यादी हे आपल्या तीन सहकाऱ्यांसह जी आर सी सैन्य विभागाचे वाहन कार्यालयीन कामानिमित्त गतसकाळी सात दरम्यान सदर घटनास्थळ मार्गे नागपूरकडे जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर क्र एम एच 40 ए के 5955 च्या चालकाने जोरदार धडक दिली तर नागपूर कडे जात असलेल्या या सैन्य वाहनांच्या मागेहून येणाऱ्या मोपेड क्र एम एच 40 बी पी 3979 च्या चालकांचे नियंत्रण सुटून सैन्य विभाग वाहनांच्या समोरील चाकात आल्याने दुचाकीचे पूर्णता नुकसान झाले .दुचाकीचालकाने दुचाकी सोडून खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला तर या अपघातात चार जण जख्मि झाले.जख्मी मध्ये शबिन शबमुगण वय 26 वर्षे, संदीपकुमार, नायक जगन्नाथ व रवींद्र चंद्रभान सर्व राहणार कॅन्टोन्मेंट कामठी चा समावेश आहे.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रामगढ येथे 29 हजार 200 रुपयांची घरफोडी

Tue May 16 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ येथे एका कुलूपबंद घरी अज्ञात चोरट्याने अवैधरित्या प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व इतर आभूषण असा एकूण 29 हजार 200 रुपयांची घरफोडी केल्याची घटना 13 मे च्या मध्यरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी सुनील भातपोहरी वय 35 वर्षे रा गुडशेड रस्ता रामगढ ने स्थानिक पोलीस स्टेशन ला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com