नागपूर:-२५ डिसेंबर २०२२ रोजी भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. अटलिबहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्य भारतीय जनता युवामोर्चाच्या वतीने ‘अटल डिबेटिंग क्लब’ चा शुभारंभ होणार आहे. त्या अंतर्गत विद्यार्थी व युवकांसाठी २६ डिसेंबर २०२२, सोमवार रोजी अटल वक्तृत्व स्पर्धा भाजयुमोच्या माध्यमातून संपूर्ण देशात आयोजित केली जाणार आहे.
नागपूर शहरातील स्पर्धेत सहभागी सर्वोत्कृष्ट ३ स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. प्रथम, द्वितीय व तृतीय या तीन विजेत्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात येईल. नागपुर शहरातील १८ ते ३५ वयोगटातील युवक व विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धा दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी गांधीबाग गार्डन सभागृह, गांधीबाग, नागपूर येथे होणार असून स्पर्धेला प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी महापौर व ओजस्वी वक्ते दयाशंकर तिवारी, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष व अटल वक्तृत्व स्पर्धा विदर्भाचे संयोजक विष्णू चांगदे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
अटल वक्तृत्व स्पर्धा १. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया सुशासनावर भर देतो, २. भारत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतो आहे, ३. आमिषाचे राजकारण ते विकासाचे राजकारणाकडे जाणे काळाची गरज, ४. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार युवकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे, ५. भारताचा अमृतकाळ : आगामी काळात युवकांचे योगदान या विषयांवर होणार आहे.
स्पर्धेचे नोंदणी करीता भाजयुमोचे संकेत कुकडे : ९६६५६७३०६४, गौरव हरडे : ८९२८०४०४५५, आशिष मोहिते : ९७३०९२२३५५, प्रशांतसिंघ बघेल : ९५४५३२३०५१, शिवम पांढरीपांडे : – ७०८३०७०१७६ यांच्यासोबत संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५००१/-, द्वितीय ३००१/- व तृतीय १००१/- रोख राहणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने विध्यार्थी व युवकांनी सहभागी सहभागी होण्याचे आवाहन भाजयूमो तर्फे करण्यात आले आहे.