संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-शिबिरामध्ये सहाय्यक आचार्य व बाल शिबिराचे सहाय्यक आचार्य यांची प्रमुख उपस्थिती
कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या सहाव्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार 22 सप्टेंबर ला भव्य सामूहिक ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या सामूहिक ध्यान शिबिराचा शुभारंभ 22 सप्टेंबर ला सकाळी 9 वाजता होणार असून शिबिराचे समापन सायंकाळी 4 वाजता गोयंका गुरुजी यांचे ऑडिओ मार्फत प्रवचनाने केल्या जाईल.या एक दिवसीय ध्यान शिबिराकरिता सहायक आचार्य व बाल शिबिर शिक्षक यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.
उल्लेखनीय आहे की 22 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता देशाचे तत्कालीन महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या शुभ हस्ते ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर चे उदघाटन संपन्न झाले होते.याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,तात्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले प्रमुख्याने उपस्थित होते.कामठी शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच देशाचे राष्ट्रपती यांनी कामठी शहराला भेट देऊन विपश्यना मेडिटेशन सेंटर चे उद्घाटन केले होते.
गेल्या सहा वर्षांपासून ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर मध्ये नियमित 10 दिवसीय, 3 दिवसीय व 1 दिवसीय शिबिराचे आयोजन केल्या जात आहे.या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपऱ्यातून साधक सहभागी होऊन ध्यान शिबिराचा लाभ घेत असतात शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व्यतीरिक्त इतर राज्यातुन सुद्धा साधकांना ड्रॅगन पॅलेस विप्सयना मेडिटेशन सेंटर मध्ये ध्यान करण्याची संधी मिळत असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.
ड्रॅगन पॅलेस विप्सयना मेडिटेशन सेंटर मध्ये सामूहिक साधनेकरिता 2 प्रशस्त सभागृह ,निवासी साधकाकरिता 72 स्वतंत्र खोल्या तसेच 100 हुन अधिक साधकांची संख्या वाढल्यास अतिरिक्त निवासी व्यवस्था सुद्धा करण्यात आले आहे.या व्यतिरिक्त सेन्टरलाईज किचन,डायनिंग हॉल,व 35 शून्यगार विपश्यना सेंटर मध्ये उपलब्ध आहेत.ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या पगोडयावर म्यानमार(ब्रह्मदेश) मधून निर्यात केलेली अंब्रेला तसेच पगोड्याला लावण्यात आलेले पेंट थायलंड वरून मागवण्यात आले होते।ड्रॅगन पॅलेस विप्सयना मेडिटेशन सेंटर हे 10 एकर जागेवर असून मोठ्या प्रमाणात लॉन बगीचा व झाडांमुळे संपूर्ण परिसर शांत व सुशोभित करण्यात आला आहे.
22 सप्टेंबर ला सकाळी 9 ते सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर येथे आयोजित एक दिवसीय सामूहिक ध्यान शिबिरात जुन्या साधकांना थेट प्रवेश दिल्या जाईल या शिबिरात जास्तीत जास्त साधकांनी सहभागी होऊन ध्यान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडिटेशन सेंटर च्या व्यवस्थापकीय संचालिका रेखा भावे यांनी केले आहे