स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कामठी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 15 : – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कामठी तालुक्यातील विविध शासकीय , निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले.

यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, पोलीस उपनिरीक्षक मोतींगे, पवार आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कामठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी संदीप बोरकर, शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक धुमाळे मॅडम तर कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी तिरंगा झेंड्याला सलामी केली. याप्रसंगी नायब तहसिलदार वर्ग, तहसील कार्यालयीन अधिकारी , कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.कामठी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रभाग क्र 2 येथे ध्वजारोहण साजरा..

Mon Aug 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 15:-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आज 15 ऑगस्ट ला कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 2 सैय्यदानी नगर येथे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के विदर्भ जोन युनिट मॅनेजमेंट कोर्डिनेटर मो.इरशाद शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सेवादल कांग्रेस चे सहसचिव राजकुमार गेडाम, नागपुर जिला युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष मो.राशीद अंसारी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com