कोदामेंढी :- येथे दर आठवड्याच्या सोमवारला मौदा येथील वैभव एचपी गॅस एजन्सी येथे नोंदणी असलेल्या गॅस ग्राहकांसाठी विशेष गाडी मौदा येथून सकाळी निघून गावागावात वाटप करत कोदामेंढी वार्ड क्रमांक दोन येथील आदर्श चौकात सकाळी साडेदहा ते अकरा दरम्यान येत असते व तेथून गॅसची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वाटप सुरू असते. इतर दिवशी पण गाड्या येत असतात परंतु त्या स्थायिक न राहता घरोघरी वेळो अवेळी वाटप करत असतात. मात्र आज सोमवार 28 ऑक्टोबरला नागपूर येथे गॅस पाईपलाईन गळती झाल्याने मौदा येथील गोदामात हंडेच उपलब्ध नसल्याने गाडी येणार नसल्याचे वैभव एचपी गॅसचे रवी नामक कर्मचारी यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.
उद्या मंगळवार 29 ऑक्टोबरला नक्की गाडी येणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले .त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी येथील व मौदा तालुक्यातील गॅस ग्राहकांना गॅसच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले आहे. संबंधित विभागाने दिवाळीच्या दिवसांमध्ये गॅसच्या तुटवडा होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी येथील व मौदा तालुक्यातील ग्यास अभावी एकही दिवस चुलीवर किंवा स्टोवर स्वयंपाक न बनवू शकणाऱ्या गृहिणींनी केली आहे.