संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षीप्रमाने यावर्षीसुद्धा महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर कामठी शहरातील शिवभक्तानी उपवासातुन फराळ तसेच खोव्याच्या जिलेबीचा आस्वाद घेतला.मात्र कामठी शहरातील 30 च्या जवळपास नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून या विषबाधेला बळी पडलेले कामठी छावणी परिषद परिसर तसेच येरखेडा व कामठी शहरातील रोगीना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये कामठी नगर परिषद चे कर्मचारी प्रदीप भोकरे व त्यांच्या मातोश्री चा समावेश आहे.
प्राप्त माहीती नुसार विषबाधा झालेल्या बहुतेक नागरिकांनी फराळ व खोव्याची जिलेबी ही कामठी शहरातील एका नामवंत हॉटेल मधून खरेदी केल्याचे सांगण्यात येते .विषबाधा झालेले छावणी परिषद परिसर रहिवासी आठ रुग्ण सुखरूप घरी पोहोचले आहेत तर येरखेडा येथील एकाच कुटूंबातील पाच रुग्ण हे लाईफ लाईन हॉस्पिटल तसेच प्रदीप भोकरे व त्याच्या मातोश्री आदी आशा हॉस्पिटल सह इतर खाजगी रुग्णालयात अजूनही उपचारार्थ दाखल आहेत.