1 मे कामगार दिनी मजूर वर्ग कामाच्या प्रतीक्षेत,चावडी चौकात कामगारांचा ठिय्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुदधा 1 मे हा कामगार दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व साधून कामठी तालुक्यात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करण्यात आला मात्र याच दिवशी आर्थिक परिस्थितीने बिकट असलेले व मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर वर्गातील पुरुष महिलांना जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील चावडी चौकात दुपारचे बारा वाजूनही कामाच्या प्रतीक्षेत ठिय्या मांडून बसल्याने आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या मजूराना पोटाची खळगी भरण्यासाठी कामाची प्रतीक्षा करीत राहल्याने या मजूराना आजच्या 1 मे महाराष्ट्र दिनी कमकुवतेची भावना जाणवली.

जगातील सर्व श्रमिकांनी एक व्हा असे काल मार्क्स यांनी सांगितले होते.अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले यांनी सुद्धा श्रमिकांना कामाचा मोबदला मिळावा यासाठी संघर्ष केला मात्र बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीच्या पाश्वरभूमीवर असंघटित अंगमेहनती ने काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न अजूनही कायम आहेत .एकविसाव्या शतकातील धकाधकीच्या युगात या असंघटित कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

कामठी चे जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील चावडी चौकात शैक्षणिक दृष्ट्या कमी शिकलेले आणो आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले मजूर कामाच्या शोधात तालुक्यातील शहर तसेच नजीकच्या ग्रामीण भागातुन सकाळपासूनच उभे राहतात. चावडी चौक हा पोलिस स्टेशन जवळील असल्याने काम मिळेल या आशेने येथे गोळा होतात परंतु बहुतांश मजुरांना दुपारचे बारा वाजेपर्यंत वाट बघूनही काम मिळत नाही व नाईलाजाने त्यांना उलटपायी घरी परतावे लागते. गावंडी, सुतार, राजमिस्त्री, मातीगोट्याचे काम करणारी असे सर्वच मजूर येथे उभे दिसतात.पूर्वी या चौकात आलेल्याना कुठलेही काम मिळायचे मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. 10मजुरांचे काम एक यंत्र करते त्यामुळे मजुरांची संख्या त्या कामावर कमी लागते परिणामी बहुतांश मजुरावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.या चावडी चौकात मजुरांसाठी पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था नसल्याने त्या मजुरांना नाहक त्रास भोगावा लागतो .पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या मुख्य जवाबदारीत सहाय्यभूत ठरलेले या मजूराना जेवणाचा डब्बा घेऊन मुलांना घरी एकटे न ठेवता सोबत घेऊन कुणाच्या आडोशाखाली नाहीतर भर उन्हात उभे राहून काम मिळन्याच्या प्रतीक्षेत ठिय्या मांडून असतात ,दुपार होऊनही काम न मिळाल्याने निराशेने उलटपायी घरी परतावे लागते तेव्हा या मजुरांना नित्यनेमाने काम मिळावे यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी येथील मजूर वर्ग करीत आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निशुल्क स्वास्थ जांच शिविर का किया आयोजन

Thu May 2 , 2024
नागपुर :- कल्याण मित्र फाउंडेशन द्वारा स्वास्थ सेवा क्षेत्र उपक्रम के तहत श्याम नगर, पारडी भंडारा रोड नागपुर में निशुल्क स्वास्थ जांच शिविर का आयोजन किया गया। कल्याण मित्र फाउंडेशन द्वारा जारी सेवा क्षेत्र उपक्रम का यह सोलहवा उपक्रम था। इस शिविर में रक्त परीक्षण ,सामन्य स्वास्थ जाँच एवं वितरण किया गया। रविवार को सम्पन हुए शिविर में १४१ लोगों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com