अमरदिप बडगे
तिरोडा :- तालुक्यातील सरांडी गावात बच्चु कडू प्रहार जनसक्ती पक्षाचे संस्थापक यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर काल गाम पंचायत सरांडी येथे आयोजित करण्यात आला होता.
महात्मे नेत्र तपासणी व रक्तदान नागपुर यांच्या सर्व चमूने तपासणी व रक्तदान कार्य केले. यावेळी 250 रुग्णाना मोतियाबींदु निघले असुन त्यांच्यावर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.डोळे तपासून चष्म्याचे 90 नागरिकांना वितरीत करण्यात आले तर 40 युवकांनी रक्तदान केले.यावेळी महेन्द्र भांडारकर जिल्हा अध्यक्ष, प्रदिप निशाने तालुका अध्यक्ष,वनीता भांडारकर पंचायत समिती सदस्य, रामेश्वर धामीक, सुरेन्द्र सुर्यवंशी तिलक पारधी ,वामन हजारे, व प्रहार जनसक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धमेन्द बंधने,विजय लिल्हारे ,भुमेश्वर निशाने , नितेश कांबळी, गणेश बंधने,संजु गुरूमेळे ,महेश कांबळी, नितेश देवगडे ,दुर्गेश करंडे, दुर्गेश भोयर, यांनी सहकार्य केले.