मनपाच्या उपद्रव शोध पथकाने विविध प्रकरणी केली कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.२१) १२ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लक्ष ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, गांधीबाग झोन आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाने विविध प्रकरणी कारवाई केली. तसेच गांधीबाग आणि मंगळवारी झोन उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २०, ०००/- रुपयांचा दंड वसूल करीत ९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच ४ खाजगी रुग्णालयांच्या विरोधात इतर रस्त्यालगत इतर कचऱ्यासह वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत महाल, गांधीगेट येथील अर्जू भांडार आणि सरताज अगरबत्ती या दुकानांविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच गांधीबाग पोस्ट ऑफिस येथील संजय ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून प्रत्येकी ५  हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मंगळवारी झोन अंतर्गत छावणी सदर येथील दिल्ली ग्रील रेस्टोरेंट या उपहारगृह विरुध्द कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत रामदास पेठ येथील गॅस्ट्रो व्हिजन हॉस्पिटल आणि  मेडिग्रेस हॉस्पिटल यांच्या विरुद्ध रस्त्यालगत इतर कचऱ्यासह वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर गोपालनगर येथील हेडाऊ बिल्डर्स यांच्या विरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत रामदासपेठ येथील ऑर्थो हॉस्पिटल आणि रेस्पिरे हॉस्पिटल यांच्या विरुद्ध रस्त्यालगत इतर कचऱ्यासह वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रामदासपेठ येथील मेडिकेअर क्लिनिक यांच्या विरुद्ध  स्त्यालगत इतर कचऱ्यासह वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.हजारिपहाड येथील महेंद्र बोरकर यांच्या विरुद्ध रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हनुमाननगर झोन अंतर्गत न्यू नरसाळा रोड येथे लाल पॅथॉलॉजी लॅब यांच्या विरुद्ध रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठाची आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम.पेट) 26 व 27 नोव्हेंबरला, संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन

Sat Oct 22 , 2022
अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम.पेट) – 2022 दि. 26 व 27 नोव्हेंबर, 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाने राजपत्र भाग- तीन मध्ये अधिसूचना प्रकाशित केली आहे. सदर परीक्षेबाबतची प्रवेशपत्रे व परीक्षेचा निकाल परीक्षाथ्र्यांना त्यांच्या लॉगिन आय.डी. वर पाठविण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित विद्याथ्र्यांनी याची नोंद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com