बच्चु कडु प्रहार जनसक्ती पक्षाचे संस्थापक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व डोळे तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

अमरदिप बडगे

तिरोडा :- तालुक्यातील सरांडी गावात बच्चु कडू प्रहार जनसक्ती पक्षाचे संस्थापक यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर काल गाम पंचायत सरांडी येथे आयोजित करण्यात आला होता.

महात्मे नेत्र तपासणी व रक्तदान नागपुर यांच्या सर्व चमूने तपासणी व रक्तदान कार्य केले. यावेळी 250 रुग्णाना मोतियाबींदु निघले असुन त्यांच्यावर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.डोळे तपासून चष्म्याचे 90 नागरिकांना वितरीत करण्यात आले तर 40 युवकांनी रक्तदान केले.यावेळी महेन्द्र भांडारकर जिल्हा अध्यक्ष, प्रदिप निशाने तालुका अध्यक्ष,वनीता भांडारकर पंचायत समिती सदस्य, रामेश्वर धामीक, सुरेन्द्र सुर्यवंशी तिलक पारधी ,वामन हजारे, व प्रहार जनसक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धमेन्द बंधने,विजय लिल्हारे ,भुमेश्वर निशाने , नितेश कांबळी, गणेश बंधने,संजु गुरूमेळे ,महेश कांबळी, नितेश देवगडे ,दुर्गेश करंडे, दुर्गेश भोयर, यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या वेबचर्चेत ; पोलीस उपायुक्त पंडीत गुन्हे शाखा

Thu Jul 7 , 2022
नागपूर  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत गुन्हे शाखा नागपूर यांची ‘अमली पदार्थ निर्मूलनात सामाजिक सहभाग व प्रतिबंधात्मक कार्यवाही’ या विषयावर उद्या विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत  https://youtu.be/OK0LhBW1O4U या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 7 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसारीत होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com