आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या वेबचर्चेत ; पोलीस उपायुक्त पंडीत गुन्हे शाखा

नागपूर  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत गुन्हे शाखा नागपूर यांची ‘अमली पदार्थ निर्मूलनात सामाजिक सहभाग व प्रतिबंधात्मक कार्यवाही’ या विषयावर उद्या विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे.

ही मुलाखत  https://youtu.be/OK0LhBW1O4U या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 7 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसारीत होईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. दुपारी 5 वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल. यासाठी वेबेक्स लिंक जाहीर केली जाणार आहे.

‘अमली पदार्थ निर्मूलनात सामाजिक सहभाग व प्रतिबंधात्मक कार्यवाही ’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत गुन्हे शाखा नागपूर या कार्यक्रमातून करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com