कुंभार समाजाच्यावतीने वृद्धाश्रम दीपोत्सव स्नेहमिलन कार्यक्रम वलगांव येथे संपन्न

कुंभार समाज बांधवांतर्फे वृद्धाश्रमात दिवाळी साजरी

अमरावती :- संत गाडगे बाबा वृध्दाश्रम, वलगांव येथे ज्येष्ठांसोबत विदर्भ कुंभार समाज सुधार समिती व श्री संत गोरोबा काका समाजोन्न्ती बहुउद्देशीय समिती अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत ।वृध्दाश्रम दिपोत्सव स्नेहमिलन कार्यक्रम। कुंभार समाज बांधवाकडून आयोजित करण्यात आला.

यावेळी श्री संत गाडगे बाबा वृद्धाश्रमात वास्तव्य करणा­ऱ्या वृद्धांना दिवाळीनिमित्त कुंभार समाजातर्फे अल्पोपहार व नवीन कपडे भेट देण्यात आली. संध्याकाळी मिष्ठान्न सह भजनाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. यावेळी पंजाबराव काकडे, अध्यक्ष समाजोन्नती समिती, सुधाकरराव शेंडोकार अध्यक्ष, विदर्भ कुंभार समाज सुधार समिती, ऑड. गजानन तांबटकर उपाध्यक्ष, वि.कुं.स.सु.समिती, डॉ. श्रीराम कोल्हे, सचिव समाजोन्नती समिती, सतीशराव गावंडे कोषाध्यक्ष वि.कुं.स.सु.समिती, प्रभा भागवत, राज्य महिला अध्यक्ष, भगवानराव जामकर, अध्यक्ष, गोरोबा काका नागरी सहकारी पतसंस्था,तसेच संस्थेचे पदाधिकारी व समाजबांधव बाळकृष्ण महानकर, शंकरराव धामणकर, विनोदराव मेहरे, गजाननराव काकडे सर, समाज भूषण सुभाष वडुरकर, खोपे, चंद्रकांत सुधाकरराव शेंडोकार, राहुल विष्णुपंत काळकर , बोरसे ,वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक, संस्थेशी जुळलेले हितचिंतक लॉयन्स क्लब ऑफ अमरावती (मेन) चे पास्ट प्रेसिडेंट पंजाबराव खंडारे व प्रकाशराव शेलापुरकर तसेच  आर.डब्ल्यू. राऊत ,अमोल भटकर, महिला प्रतिनिधी मंदा श्रीकृष्णराव काळे, शुभांगी काकडे, नंदाताई शेंडोकार,पल्लवी शेंडोकार , आशा महल्ले इ. उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातील ध्यान व सर्व धर्म प्रार्थना घेण्यात आली. त्यानंंतर गोरगरीब वृद्धांसह समाजातील सर्वांना फराळाचे वाटप करण्यात आले. याशिवाय दिवाळी निमित्त नवीन कपडे सुद्धा देण्यात आले.

याप्रसंगी समाजातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, वृध्दाश्रमातील ज्येष्ठ ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक उन्हाळे पावसाळे पाहीले,अनुभवलेत अनेकविध सुख दु:खाला सामोरे गेले,अनेकांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले, अनेकांच्या आयुष्याचा गुंता सोडविला, अनेकांचे दिवाळसण साजरे केले त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची दिवाळी मात्र वृध्दाश्रमात व्हावी याचे शल्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. वृध्दाश्रमात राहणाऱ्या प्रत्येकाचे दु:ख वेगळे,प्रत्येकांच्या समस्या वेगळ्या,प्रत्येकांच्या वेदना वेगळ्या,प्रत्येकांच्या मनातील भाव वेगळे असुनही येथे सर्वजण एकमेकांशी रक्ताचे नाते नसतांना देखील गुण्यागोविंदाने, कुठलीही कुरबूर न करता सामंजस्याने एकत्रित राहतात. परंतू स्वतःच्या कुटुंबा सोबत मात्र राहू शकत नाहीत, हे शल्य देखील जेष्ठांना बोचत असल्याचे जाणवले.

विदर्भ कुंभार समाज सुधार समिती व समाजोन्नती समिती गेल्या सहा वर्षांपासून दिवाळीनिमित्य वृध्दाश्रमात जेष्ठांसोबत स्नेहमिलन कार्यक्रम सातत्यपूर्ण आयोजित करीत आहे आणि दरवर्षी आपण आपल्याच जीवनाच्या उतरणीची वाट अधिक जवळून समजून घेत असल्याचा प्रत्यय अनुभवत आहे. येथे आल्यानंतर मनाला शांती मिळते. काही क्षण का होईना संसार चक्रातून मुक्त झाल्याचे जाणवते. येथे आल्यानंतर एवढे मात्र निश्चित जाणवते की,व्यक्तिच्या जीवनातील मान-मरातब, रूतबा,ऐश्वर्य, सामाजिक राजकीय आर्थिक स्तर मृगजळ आहे.अंतिम सत्य हेच आहे की आयुष्याच्या उतरणीवर मनःशांती नसेल तर सर्व व्यर्थ आहे अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्यात.

दिवाळीनिमित्त हा कार्यक्रम आयोजनासाठी कुंभार समाजातील बांधवांना देणगी स्वरूपात रक्कम समितीकडे दिली होती. सर्व पदाधिका­यांनी या कार्यासाठी सहकार्य केले असून त्यांच्याप्रती याप्रसंगी विदर्भ कुंभार समाजाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडोकार यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फ्रीडम राईडर बाईक रॅलीचे नागपूरमध्ये स्वागत ७५ बाईकर्सचा २५ हजार किलोमिटरचा प्रवास

Mon Oct 31 , 2022
नागपूर :- आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या 75 बाईकर्सचा ताफा 25 हजार किलोमीटरच्या प्रवासादरम्यान नागपूर येथे आज पोहोचला. नागपूरच्या क्रीडा जगताने या धाडसी प्रवाशांचा उत्साहात सन्मान केला. केंद्र व राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया मोटारबाईक एस्पिटिशन (AIME) यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ७५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!