संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पासुन पुर्वेस १० किमी अंतरावरील एसंबा (सालवा) शेतातील बांधीत दोघे काम करताना एका एक जोरदार पाऊस येण्या अगोदर जोराच्या कडाक्या सह अंगावर विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला.
शनिवार (दि.३०) जुलैला दुपारी कन्हान परिसरात जोरदार विज गर्जेनेसह पाऊस आल्याने मौदा तालुक्यातील एंसबा (सालवा) शेत शिवारात शेतकरी दिपक पाडुरंग महल्ले वय ५४ वर्ष राह. एंसबा (साल वा) यांची ४ एकर शेती असुन शेतात धानाची लावण करण्याकरिता ट्रक्टरने चिखल करून बांध्यात जावई नेपाल मनोहर फुटाणे व दिपक महल्ले हे दोघेही बांध्यात काम करित होते. दुपारी १ वाजता दरम्यान एकाएक जोरदार विज गर्जेनेसह पाऊस येऊन शेतकरी दिपक महल्ले यांच्या अंगावर विज पडुन त्यांचे कपडे जळुन शरीर भाजुन घटनास्थळीच त्याचा मुत्यु झाला. बाजुच्या बांधीत काम करणारे जावाई नेपाल फुटाणे यांना अमोल महल्ले ला बोलावुन पाहीले तर दिपक महल्ले यांचे अंग जळुन मुत्यु झाल्याचे दिस ल्याने त्याना उचलुन वाहनाने कन्हान पोलीस स्टेशन ला कळवुन कामठी ग्रामिण उपजिल्हा रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरानी त्यांचा घटनास्ळीच मुत्यु झाल्याचे घोषित केल्याने कन्हान पोस्टे ला पुतण्या अमोल सुधाकर महल्ले यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे.
शेतकरी दिपक महल्लेच्या कुंटुबास शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी.
एंसबा (सालवा) येथील शेतीत शेतकरी दिपक महल्ले यांच्या अंगावर विज पडुन मुत्यु झाल्याने त्यांच्या परिवारातील पत्नी, दोन मुली, दोन मुले यांच्या दु:खाचा डोंगर कोसळुन शेतक-याचा परिवार हवालदिल होत आर्थिक संकटात सापडल्याने शासन, प्रशासनाने या कुंटुंबास तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी एंसबा व परिसरातील ग्रामस्थ शेतक-यांनी केली आहे.