संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-चार आरोपी अटकेत,1 लक्ष 22 हजार 1652 रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 5:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन , अविनाश शाळेजवळ रहिवासी असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारी च्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने व नगदी 25 हजार रुपये असा एकुण 1 लक्ष 53 हजार 365 रुपयांची घरफोडी झाल्याची घटना 1 फेब्रुवारी 2022 ला घडली असता यासंदर्भात फिर्यादी नवीन कामठी पोलीस स्टेशनचे महिला पोलीस कर्मचारी लक्ष्मी सोनू रामटेके वय 30 वर्षे रा न्यू खलाशी लाईन कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला दिलेल्या गतीतून या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात जुनी कामठी पोलिसांना नुकतेच यशप्राप्त झाले असून या कार्यवाहीतुन चार आरोपीस अटक करीत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी , चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लक्ष 22 हजार 1652 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपीमध्ये तरुण मेश्राम वय 20 वर्षे रा जे पी नगर कामठी, आशिष उर्फ चिपड्या मामा बागडे वय 33 वर्षे रा जयभीम चौक , कामठी, निकून उर्फ निक्की साधवानी वय 30 वर्षे रा दाल ओली नं 1, कामठी तसेच अंशुल गजभिये वय 19 वर्षे रा पंचशील नगर, सत्रापुर कन्हान असे आहे.यातील मुख्य आरोपी तरुण मेश्राम याने जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील मोदी पडावं येथे केलेली घरफोडीची कबुली देत त्याकडून चोरी केलेली 1 सोन्याची नग पोलिसांना सुपूर्द केली तसेच कपिलनगर नागपूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे कबुली दिली. यावरून जुनी कामठी पोलिसांनी तीन गुन्ह्याचा पर्दाफाश केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी लक्ष्मी रामटेके ह्या कुटुंबासह 1 फेब्रुवारीला घराला कुलूपबंद करून एका कार्यक्रमात सहभागी होण्यास गेले असता चोरट्यानी घरात कुणी नसल्याची संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने सह नगदी 25 हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली होती.यासंदर्भात पोलिसांनी मोठ्या शिताफीने व तर्कशक्तीच्या आधारावर या चोरट्यांचा शोध लावून चारही चोरट्यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्पलेंडर दुचाकी क्र एम एच 40 सी एफ 2305 , सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लक्ष 22 हजार 1652 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही यशस्वी कार्यवाही डीसीपी सारंग आव्हाड, एसीपी नयना आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ ,जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या नेतृत्वात डी बी स्कॉड चे इंचार्ज अधिकारी पोलीस उपनिरीक्षक के बी माकने, पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ राखुंडे, तपास पथक प्रमुख डी बी स्कॉड चे संजय गीते, अरविंद साखरे, महेश कठाने, श्रीकांत विष्णुरकर, अंकुश गजभिये यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.