संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधित तंबाकुच्या अवैध विक्रीमुळे नागरिकांच्या जीवाशी सर्रास खेळ खेळण्याचा प्रकार कामठी शहरात सुरू असून शहरातील हमालपुरा येथून अवैधरित्या सुगंधित तंबाकू ,खर्रा बिनधास्तपणे विकत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना कळताच पोलिसांनी काल सायंकाळी सहा दरम्यान हमालपुरा येथील सुगंधित तंबाकू विक्रीच्या अवैध अड्यावर धाड घालण्यात यश गाठले असून या कारवाहितुन सुगंधित तंबाकू मिश्रित खर्रा,विविध कंपनीचे सुगंधित तंबाकू चे पॉकिट,सुपारी असा एकूण 37 हजार 584 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीस अटक करण्यात आले अटक आरोपीचे नाव अमोल मांनवटकर वय 31 वर्षे रा हमालपुरा कामठी असे आहे.
ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनार्थ एपीआय गढवे, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने व सहकारी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.