नवनियुक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेची पहिली सभा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- समाजात उपेक्षित जीवन जगणाऱ्या दिव्यांग, विधवा, परितक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना चालवल्या जातात. परंतु यासाठी लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची मुख्य भूमिका असते .तेव्हा ही लाभार्थी निवड करतेवेळी लाभार्थी अर्जदाराच्या अर्जाला जोडलेली कागदपत्राची योग्य ती शहनिशा करून लाभ मिळवून दयावा तसेच कोणताही लाभार्थी या योजनेच्या लाभापासून विनाकारण वंचीत राहणार नाहो याची दक्षता घ्यावी असे आवाहन नायब तहसीलदार अमर हांडा यांनी आज कामठी तहसील कार्यालय सभागृहात आयोजित नवनियुक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीच्या पहिल्या बैठकीत व्यक्त केले.

नवनियुक्त समिती ची पहिली बैठक तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ व नायब तहसीलदार अमर हांडा यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चे कामठी तालुका अध्यक्ष रमेश चिकटे , सदस्य विजय कोंडूलवार, सविता जिचकार,बापूराव सोनावणे, संजय मोरे,संजू कनोजिया, खेमराज हटवार या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.व बैठकिला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी नायब तहसिलदार अमर हांडा यांनी सांगितले की ६५ वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी भूमीहीन शेतमजूर योजना तसेच विधवा, परितक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी संजय गांधी स्वावलंबन योजना चालविली जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये प्रतीमहा अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होते. तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वर्ष वयोगटातील कमावत्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना चालविली जाते. या कुटुंबास २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. व महसूल विभागाच्या अखत्यारीतील या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीकडून केली जाते.या बैठकीचे प्रास्ताविक नायब तहसीलदार अमर हांडा यांनी केले.तर आभार सेवानिवृत्त नायब तहसीलदार आर उके यांनी मानले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com