बोधिवृक्षाच्या सावलीखाली साकारतेय कामठी चे जुनी कामठी पोलीस स्टेशन 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- 7 जानेवारी 2015 ला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते लोकार्पित कामठी चे जुनी कामठी पोलीस स्टेशन हे बोधिवृक्षाच्या सावलिखाली साकारत असून हे बोधिवृक्ष शांतीचा संदेशवाहक ठरत आहे.

सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार झपाट्याने होऊन बौद्ध धर्म भरभराटीस उदयास आला होता. जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी कन्या संघमित्रा व पुत्र महेंद्र यांना बिहारमधील बुद्धगया येथे तथागत गौतम बुद्धाच्या ज्ञानप्राप्ती झालेल्या बोधिवृक्षाचे रोपटे घेऊन श्रीलंकेला पाठविले. श्रीलंकेतील अनुराधापुरण्या येथे त्यांचे रोपण केले. हे स्थळ श्रीलंकेतील बौद्ध धर्मोयांचे श्रद्धास्थान झाले आहे तर श्रीलंका सरकारने हा बोधिवृक्ष राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केला असून त्याभोवती संरक्षन भिंत बांधण्यात आले व त्यावर सोन्याचा कळस आहे त्याचप्रमाणे 1968 साली भदंत आनंद कौसलयान यांच्या हस्ते लावण्यात आलेल्या बोधिवृक्षाचे रोपट्याचे रोपण झालेले बोधिवृक्ष नागपूरच्या पवित्र अश्या दीक्षाभूमी वर डौलात उभे राहताना दिसत आहे तर तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार असलेले पिंपळाचे झाड हे बोधिवृक्ष आता शांतीचा संदेशवाहक असल्याने या पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधन्यात येते सुदैवाने हे बोधिवृक्ष कामठीतील जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या आवारात दिसून येते.

मागील काही वर्षांपूर्वी जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या सुरक्षा भिंतीच्या आतच निसर्गनिर्मित पिंपळाचे रोपटे उदयास आले या रोपट्याला सेवानिवृत्त सहाययक पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी पाणी देत होते आजच्या स्थितीत या रोपट्याचे रोपामध्ये रूपांतर होऊन एका बोधिवृक्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे .कामठी शहरातील विविध शासकीय निमशासकिय कार्यालय बघितले असता कुठेही या परिसरात पिपळाचे झाड दिसून येत नाही मात्र या जुनि कामठी पोलीस स्टेशन परिसरातील बोधिवृक्षमुळे या पोलीस स्टेशन ला एक वेगळेच शांतिप्रिय स्वरूप प्राप्त असून रमणीय व शांतिप्राप्त वातावरण दिसून येते तसेच पोलीस वर्ग नागरिकांशी सौजण्याची वागणूक करीत असल्याने या पोलीस स्टेशन ला समाधानी वातावरण दिसून येतो तर हे बोधिवृक्ष शांतीचा संदेशवाहक ठरताना दिसून येतो.

जुनी कामठी पोलीस स्टेशन चा विचार केला असता कामठी तसेच आजूबाजूच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागातर्फे 25 मार्च 1959 ला येथील मध्यभागी असलेल्या चावडी चौकातील एका दानदात्याच्या ब्रिटिशकालीन इमारतीत पोलीस स्टेशन चा कारभार सुरू करण्यात आला होता या पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर जबलपूर महामार्ग क्र 7 वरील नागलोक पासून ते पारशिवणीची शेवटची हद्द त्यात तारसा गावापर्यंतची हद्द मर्यादित होती या हद्दीतील कायदा व सुव्यवसथा नियंत्रित ठेवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पद हे कार्यरत असून त्यावेळी 1 पोलीस उपनिरीक्षक, 2 हेडकोन्स्टेबल, 6 पोलीस शिपाई एवढेच कर्मचारी तैनात होते यावेळी कन्हान पोलीस स्टेशन अस्तित्वात नव्हते. 20 एप्रिल 1972 ला पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक पद अपग्रेड झाले.यानुसार 18 सप्टेंबर 1972 ला पोलीस निरीक्षक पद कार्यरत करण्यात आले यावेळी हे पोलीस निरीक्षक कॅन्टोन्मेंट परिसरातील एसडीपीओ कार्यालयात बसायचे त्यावेळी कामठी, कन्हान, कोराडी व कान्द्री या ठिकाणी चार पोलीस चौकी सुरू करण्यात आल्या. 1980 ला कन्हान, खापरखेडा, कोराडी हे स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू झाल्याने पोलीस निरीक्षक च्या कार्यक्षेत्राची हद्द कमी झाली यावेळी कार्यरत पोलीस स्टेशन चे काम सुरू झाले व 3 डिसेंबर 1980 ला टी बी देवतळे , पोलीस नोरीक्षक कामठी यांनी पोलीस स्टेशन च्या स्वतंत्र कारभार सांभाळण्याची जवाबदारी स्वीकारली.स्थानिक कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी पोलिसांवर असते या शहराची संवेदनशिलता लक्षात घेता शहरात कित्येक अप्रिय घटना, जातोय दंगल सारख्या घटना घडल्याने शहराचा वाढता गुन्हेगारीचा व्याप व नागरिकाची सुरक्षितता लक्ष्यात घेत कामठीतील या ब्रिटिशकालीन जुने कामठी पोलिस स्टेशनच्या इमारतीतून कामठी रोड वरील नाविन्यपूर्ण इमारतीत 14 जून 2012 ला स्थानांतरण करण्यात आले. मात्र 7 जुलै 2012 ला घडलेल्या एका घटनेमुळे जाती वैमनस्य निर्माण होऊन पोलीस स्टेशन वर दगडफेक व जाळपोळ करून लाखो रुपयांचा मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते या घटनेेची निंदनीय चिंता व्यक्त करीत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून अतिरिक्त पोलीस स्टेशन ची मान्यता मिळवीत जुनी कामठी पोलिस स्टेशन हे अतिरिक्त पोलीस स्टेशन म्हणून कारभार सुरु करण्यात आला तर सद्यास्थीतीत हे दोन्ही पोलीस स्टेशन शहर पोलीस आयुक्तालयात समावेश आहेत.तर जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या आवारात असलेल्या या बोधिवृक्षाला शांतीचा संदेशवाहक गृहीत धरून काही पोलीस कर्मचारी या बोधिवृक्षाला अभिवादन करताना दिसून येतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजौरी मुठभेड़: सर्च ऑपरेशन के दौरान IED ब्लास्ट, 5 जवान शहीद, 2 घायल

Fri May 5 , 2023
जम्मू-कश्मीर :-जम्मू-कश्मीर में सुरक्षाबल लगातार आतंकियों के सफाए में जुटे हुए हैं. इसके लिए समय-समय पर ऑपरेशन भी चलाए जाते हैं. ऐसा ही एक ऑपरेशन राजौरी में चलाया जा रहा है. जानकारी के मुताबिक यहां 2-3 आतंकियों के छिपे होने की जानकारी मिली थी जिसके बाद तलाश अभियान के दौरान मुठभेड़ शुरू हो गई हालांकि अब तक इस मुठभेड़ में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!