खासगी बालवाड्यांवर आता राज्य सरकारचे नियंत्रण, नेमके होणार काय?

पुणे :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पूर्वप्राथमिक शिक्षणात समानता आणण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी बालवाड्यांची मान्यता, किमान सुविधा, अभ्यासक्रम या संदर्भात नियंत्रण आणण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा शिक्षण विभागाने तयार करून राज्य शासनाला सादर केला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी बालवाड्यांवर नियंत्रणाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात शासकीय अंगणवाड्यांसह खासगी बालवाड्या अक्षरश: गल्लोगल्ली आहेत. मात्र त्यावर कोणतेही शासकीय नियंत्रण नाही. बालवाडी सुरू करण्यासाठीची मान्यात प्रक्रियाही सध्या अस्तित्त्वात नाही. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पूर्वप्राथमिक शिक्षण आता शिक्षणाच्या चौकटीत आणण्यात आले आहे. तसेच पूर्वप्राथमिक ते दुसरीसाठीचा राज्य स्तरावरील अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता राज्यातील खासगी बालवाड्यांवर सरकारी नियंत्रण आणण्यात येणार आहे.

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की खासगी बालवाड्यांवर नियंत्रण आणण्याबाबतच्या नियमावलीचा मसुदा तयार करून काही दिवसांपूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आला. तज्ज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यास करून ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात मान्यता प्रक्रिया, अभ्यासक्रम, किमान सुविधा यावर भर देण्यात आला आहे. खासगी बालवाड्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत समानता आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या नियमावलीचे विधेयक तयार होऊन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुनील केदारांना तापासोबतच श्वसनमार्गातही संक्रमण; ‘एन्जिओग्राफी’बाबत शक्यता तपासणार

Tue Dec 26 , 2023
नागपूर :- न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांना रविवारीही १०२ डिग्री ताप आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर एन्जिओग्राफी करता येईल का, याबाबतची शक्यता उद्या तपासली जाणार आहे. केदार यांच्या क्ष-किरण तपासणीत रविवारी न्युमोनियाची प्राथमिक लक्षणे आढळली होती. सोबत त्यांच्या श्वसनमार्गातही संक्रमण, १०२ डिग्री ताप व त्यांचे क्रिएटिनिन वाढल्याचेही पुढे आले होते. एन्जिओग्राफी करताना द्याव्या लागणाऱ्या ‘डाय’मुळे मूत्रपिंडाला धोका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!