आता… राजश्रीताईंना दिल्लीला पाठवा – भावना गवळी

– भावना गवळी यांनी केले राजश्री पाटील च्या वक्तृत्वशैलीचे कौतुक

यवतमाळ :- गेल्या काही दिवसांपासुन खा. भावना गवळी उमेदवारीवरुन नाराज असल्याच्या वावड्या उडविल्या जात होत्या. त्यावर दस्तुरखुदद खा. भावना गवळी यांनीच पुर्णविराम लावला. आपण नाराज नसुन सर्व ताकदीनीशी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी वाशिम जिल्हयातील कळंबा महाली येथील प्रचार सभेत सांगीतले. यवतमाळ–वाशिम लोकसभेतील मतदारांनी प्रचंड प्रेम करीत आपलयाला सलग पाच वेळा खासदार म्हणुन दिल्लीला पाठविले. आता राजश्री पाटील यांना दिल्लीला पाठवा असे आवाहन देखिल खा. भावना गवळी यांनी मतदारांना यावेळी केले.

यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ ताकदीनीशी कामाला लागल्या आहेत. गावोगावी प्रचार सभांमध्ये धुरळा उडवित महायुतीचा प्रचार करीत आहेत. काल दि. १७ एप्रिल रोजी वाशिम जिल्हयातील कळंबा महाली येथे झालेल्या प्रचार सभेत खा. भावना गवळी यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या वक्तृत्वाचे प्रचंड कौतुक केले. राजश्री उत्तम वक्त्या आहेत. त्या दिल्लीत सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या भावना समर्थपणे मांडतील असा विश्वास मतदारांना दिला. मतदारांनी ज्या विश्वासाने आणि आपुलकीने आपल्याला पाच वेळा दिल्लीला पाठविले त्याचप्रमाणे आता राजश्रीताईंना खासदार म्हणुन दिल्लीला पाठवा असे आवाहन देखिल खा. भावना गवळी यांनी मतदारांना केले.

प्रचार सभेत संवाद साधतांना खा. गवळी यांनी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महीलांसाठी केलेल्या भरीव कामाचा लेखाजोखा मांडला. पंतप्रधान मोदी सक्षम नेतुत्व आहेत, सारा देश मोदीकडे आशेने बघत आहे. महासत्ता बनविण्यासाठी आणि मोदीजींचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीला मत द्या, असे आवाहन देखिल यावेळी खा. भावना गवळी यांनी केले. या सभेला महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांच्यासह नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी केले मतदान

Fri Apr 19 , 2024
नागपूर :- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज सपत्नीक रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com